टिईटी परीक्षेचे अर्ज जानेवारीत भरता येणार
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेत (टिईटी ) अर्ज जानेवारीत घेतले जाणार आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात पहिली ऑनलाइन टिईटी परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. यामुळे भावी शिक्षकांना येत्या नविन वर्षात आता टिईटीची परीक्षा देता येणार आहे.
राज्यातील विविध शाळामध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवी गट आणि दूसरा इयत्ता सहावी ते आठवी गट अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेतली जाते. तब्बल चार वर्षाच्या कालावधीनंतर शिक्षण विभागाकडून ही टिईटी घेतली जाणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया आणि त्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
राज्यातील सरकारी,अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहे. यामुळे राज्यातील शाळांना मोठ्या प्रमाणात टिईटी ही परीक्षा देण्याची संधी शिक्षकाना उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत सर्व परीक्षा या ऑफलाइन अर्थात ओएमआर शिट वर घेतल्या जात होत्या . परंतु ,इतर परीक्षाप्रमाणे टिईटी सुद्धा आता ऑनलाइन परीक्षेसाठी राज्यात उपलब्ध असलेल्या परीक्षेसाठी केंद्राच्या तारखा मिळवण्याचे काम सुरू असल्याचे परिषदेतून सांगण्यात आले.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी OOAcademy.co.in या संकेतस्थळाला रोज ला भेट द्या.