भारतीय राज्यव्यवस्था आणि संघराज्यपद्धती अभ्यासक्रम पीडीएफ नोट्स डाऊनलोड

भारतीय राज्यव्यवस्था आणि संघराज्यपद्धती अभ्यासक्रम पीडीएफ नोट्स डाऊनलोड

भारतीय राज्यव्यवस्था आणि संघराज्यपद्धती अभ्यासक्रम पीडीएफ नोट्स डाऊनलोड

भारतातील संघराज्य म्हणजे काय?

फेडरलिझम ही सरकारची एक प्रणाली आहे ज्यामध्ये केंद्र आणि त्याचे घटक भाग जसे की राज्ये किंवा प्रांतांमध्ये अधिकार विभागले गेले आहेत . राजकारणाचे दोन संच सामावून घेण्याची ही एक संस्थात्मक यंत्रणा आहे, एक केंद्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर आणि दुसरा प्रादेशिक किंवा प्रांतीय स्तरावर.

भारतीय राज्यघटना म्हणजे काय?
भारताचे संविधान (अन्य नावे: भारताची राज्यघटना, भारताची घटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो.

उदीष्टे :-

प्रत्येक संस्था , संघटना विशिष्ट नियमाप्रमाणे कार्य करत असते. राज्य ही राजकीय संस्था आहे. राज्याच्या मूलभूत नियमाना राज्यघटना म्हणतात . भारताच्या नागरिक या नात्याने प्रत्येक विद्ययार्थ्याला भारतीय राज्यघटनेची ओळख असायला हवी . राज्यघटनेची ओळख निश्चितच देशाचा जागृत नागरिक घडवित असते.

प्रस्तावना :-

नगरिकत्वाच्या प्रशिक्षणाचा पाया भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासाने घातला जातो. नगरिकांमध्ये जागरूकता आणणे हेच राज्यघटनेच्या अभ्यासाचे ध्येय आहे.

  1. भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविक माहिती :-

भारतीय राज्यघटना घटना समितीने बनविले आहे. घटनासमितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते.

निरनिराळया देशांच्या राज्यघटनाचा आणि आपल्या देशाच्या परिस्थितीचा अभ्यास करून घटना बनविली . घटना बनविण्यास 2 वर्षे , 11 महीने 18 दिवस एवढा कालावधी लागला. 26 जानेवारी 1950 पासून भारताची राज्यघटना लागू करण्यात आली . त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस गणराज्य म्हणून साजरा केला जातो.

2. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका आणि घटनेचे तत्वज्ञान .

प्रत्येक देशाच्या राज्यघटनेला स्वत:चे तत्वज्ञान असते. भारतीय राज्यघटनासुद्धा विशिष्ट तत्वे व मूल्यावर आधारित आहे. ही तत्वे व मूल्ये आपल्या राज्यघटनेचा पाया आहे. त्यालाच आपण भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान म्हणतो.

उद्देशपत्रिका म्हणजे काय :-

राज्यघटनेची प्रारंभीची प्रस्तावना किंवा सारांश म्हणजे राज्यघटनेची उदेशपत्रिका होय

उद्देशपत्रिकेचे महत्व :-

उद्देशपत्रिकेला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात कारण त्यावरून संपूर्ण राज्यघटनचे तत्वज्ञान स्पष्ट होते. स्वतंत्र भारतात घटनाकार कोणत्या प्रकारचे राजकीय , सामाजिक , आर्थिक, वातावरण निर्माण करून इच्छित होते याची जाणीव उद्देशपत्रिकेवरून होते.

भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका :-

“आम्ही भारतीय जनता, भारताचे एक सार्वभौम , समाजवादी , धर्मनिरपेक्ष , प्रजासत्ताक , गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नगरिकांना

न्याय – सामाजिक , आर्थिक आणि राजकीय

स्वतंत्र – विचार , उच्चार , विश्वास , श्रद्धा , पूजा , उपासना यांचे

समता – दर्जा व संधीबाबत

बंधुता – व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता राखणारी ही उद्दिष्टे प्राप्त करून देण्याच्या आमच्या या घटनासमितीत आज 26 नोव्हेंबर 1948 या दिवशी निर्धार करीत आहोत.

1.4 भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :-

1.4 राज्यघटना म्हणजे काय ?

राज्यघटनेची अनेक व्याख्या विविध विचारवंतांनी केलया आहेत. सोप्या शब्दात राज्यघटना म्हणजे देशाचा मूलभूत व सर्वश्रेष्ठ कायदा होय.

1.4.2 महत्व :-

राज्यघटना लोकशाही व्यवस्थेचा आधार आहे. प्रत्येक देशाची स्वत: ची राज्यघटना असते . प्रत्येक देशाच्या सामाजिक, आर्थिक राजकीय परिस्थिति आणि देशाच्या गराज्यप्रमाणे त्या देशाच्या राज्यघटनेला आकार आलेला असतो. राज्यघटनेमुळे राज्यात कायद्याचे राज्य निर्माण होते.

  1. जगातील सर्वात व्यापक , विस्तृत आणि लिखित राज्यघटना

जगातील आतापर्यंतच्या सर्व राज्यघटनामध्ये भारताची राज्यघटना सर्वात मोठी आहे. भारताची राज्यघटना 22 भागात विभागलेली आहे. मूल घटनेची 395 कलमे व 8 परिशिष्टे आहेत.

2)घटनेची विविध उगमस्थाने

भारतीय राज्यघटना निर्माण करताना घटनाकारानी इतर देशांच्या राज्यघटनाचा सखोल अभ्यास केला . ज्या तरतुदी योग्य वाटल्या त्या तरतुदी भारतीय परिस्थिति आणि गराजांशी जुळवून स्वीकारल्या.

भारतीय राज्यघटनेची इतर माहिती

भारताची राज्यघटना नोट्स PDF डाउनलोड करा

भारतीय राज्यघटना निर्मिती महत्वाचे प्रश्न उत्तरे

भारतीय राज्यघटना महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय

MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं 1

MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं 2

डाऊनलोड पीडीएफ

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *