सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी नोट्स 2020

सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी नोट्स MPSC General Science Notes

सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी नोट्स

हेलिअम (He), नियॅान (Ne), आरगॅान (Ar) यांच्या सारखे निष्क्रिय वायू किंवा राजवायू मुक्त अवस्थेत आढळून येतात.

हायड्रोजन(H), ऑक्सिजन(O), क्लोरीन(CI), सोडियम (Na), मॅग्नेशिअम (Mg) इ. मूलद्रव्ये रेणू किंवा संयुगाच्या रुपात आढळतात.

राजवायूंच्या बाहयतम कक्षेत आठ इलेक्ट्रॉन असून त्यांच्या बाहयतम कक्षा पुर्णपणे भरलेल्या आहेत. त्या कक्षांना अष्टक म्हणतात.

राजवायूंव्यतिरिक्त इतर सर्व मूलद्रव्यांच्या बाहयतम कक्षा अपूर्ण असतात.

रासायनिक बदलात धातूंची इलेक्ट्रॉन देण्याची तर आधातूंची इलेक्ट्रॉन घेण्याची अथवा भागीदारी करण्याची प्रवृत्ती असते.

ऋणभारीत इलेक्ट्रॉन दिल्यामुळे धनप्रभारीत आयन तयार होतो. त्याला कॅटायन असे म्हणतात.

इलेक्ट्रॉन दिल्यानंतर सोडीयमच्या इलेक्ट्रॉनी संरूपणात बदल होऊन तो निऑन (Ne) या निकटतम निष्क्रिय वायूंचे स्थायी इलेक्ट्रॉनी संरूपन प्राप्त करतो.

ऋणप्रभारित आयनास अॅनायन (Anion) असे म्हणतात.

रेणूंमध्ये अणूंना एकत्र धरून ठेवण्यास जी आकर्षण शक्ती जबाबदार असते त्या आकर्षण शक्तीला रासायनिक बंध म्हणतात.

एका अणूपासून दुसर्या  अणुकडे इलेक्ट्रॉनच्या स्थानांतरणामुळे तयार होणार्या) रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विधुत संयुज बंध म्हणतात.

Na व C1 स्वतंत्रपणे धोकादायक असले तरी त्यांचे संयुग मीठ (NaC1) सुरक्षित आहे.

सारख्याच किंवा एका मूलद्रव्यापासून तयार होणारी संयुगे दोन आणूमधील देवघेवीमुळे तयार होत नाहीत, तर संयोग पावणार्याद अणूमध्ये होणार्‍या N इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे तयार होतात. या बांधाला ‘सहसंयुज बंध’ असे म्हणतात.

जेव्हा रेणुमधील दोन अणूमध्ये एकाच इलेक्ट्रॉन जोडीची भागीदारी होऊन बंध तयार होतो. त्या बांधाला एकेरी बंध असे म्हणतात.

मिथेन रेणुमध्ये C-H असे चार एकेरी बंध असतात.

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी नोट्स

आजमितीस ११९ मूलद्रव्ये ज्ञात आहेत, त्यापैकी ९२ निसर्गात आढळतात.

१८६९ मध्ये दिमित्री इव्हानोविच मेंडेलिव्ह या रशियन रसायनशास्त्रज्ञाने आवर्त सारणी मांडली.

त्याच्या मतानुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म तसेच त्यांच्या संयुगाची रेणुसूत्रे व गुणधर्म त्याचे अणु भाराचे आवर्तीफल असतात.

१९१३ मध्ये हेंरी मोस्ले याने असे शोधून काढले की मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म त्याचे अणुवस्तुमान हा नसून त्याचा अणु Z हा आहे.

आधुनिक आवर्तसारणीलाच आवर्तसारणीचे दीर्घरूप असे म्हणतात.

आधुनिक आवर्तसारणीमध्ये सात आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्त म्हणतात. आठरा उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात.

मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन संरूपणाआधारे आवर्तसारणीची विभागणी एस-खंड, पी-खंड, दी-खंड आणि एक-खंड अशा चार खंडामध्ये केली जाते.

इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारे मूलद्रव्याचे प्रसामान्य, निष्क्रिय, संक्रमण आणि अंतस्थ संक्रमण मूलद्रव्ये असे चार प्रकार होतात.

पॅराफीनमेण हे विधूत दुर्वाहक आहे. विधुत वहनासाठी चांदी ही मेणापेक्षा १०२४ पटीने अधिक परिणामकारक आहे.

अणू व रेणू विधुतदृष्टया उदासिन असतात.

ज्या पदार्थाचे जलीय द्रावण विधुत प्रवाहाचे वहन करू शकते त्याला विधुत अपघटनी पदार्थ असे म्हणतात. जे द्रावण विधुत प्रवाहाचे वहन करू शकत नाही त्याला विधुत अनपघटनी पदार्थ असे म्हणतात.

ग्लुकोज, युरिया, साखर, अल्कोहोल हे अपघटनी आहेत.

धनाग्रीकरण (Anodizing) प्रक्रिया ही विधुत अपघटनाचे उपयोजन आहे. या प्रक्रियेचा उपयोग अॅल्युमिनिअमचा पृष्टभाग गंजरोधक आणि क्षरणरोधक करण्यासाठी होतो.

दोन किंवा अधिक पदार्थांच्या समांग मिश्रणाला द्रावण असे म्हणतात.

‘पार्याअमध्ये तांबे’ हे द्रवामध्ये स्थायू या प्रकारचे द्रावण आहे.

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी नोट्स

शुद्ध पाणी हे नैसर्गिक द्रावक आहे.

लिंबाचा रस चवीला आंबट असून त्याने तिला निळा लिटमस कागद तांबडा होतो.

सोडबायकार्बनचे द्रावण हाताला गुळगुळीत लागते. त्याने तांबडया रंगाचा लिटमस कागद निळा होतो कारण हे द्रावण अल्कधर्मी (Basic) आहे.

जो पदार्थ पाण्यात विरघळला असता H+ आयन देतो त्याला आम्ल म्हणतात.

जो पदार्थ पाण्यात विरघळला असता OH- आयन देतो त्याला आम्लारी म्हणतात.

रेणुवस्तुमान म्हणजे 12c हा संदर्भ अणू धरून व्यक्त केलेले सापेक्ष वस्तुमान होय.

पदार्थाचे वस्तुमान ग्रॉममध्ये व्यक्त केल्यास त्याची अंकीय किंमत पदार्थाच्या रेणूवस्तुमानएवढी असते. त्याला ग्रॅम मोल म्हणतात.

पदार्थाचे जे वजन हायड्रोजनच्या १.००८ वजनी, ऑक्सीजनच्या ८ भाग वजनी किंवा क्लोरीनच्या ३५.५ भाग वजनी या प्रमाणात संयोग पावते त्याळा पदार्थाचा सममूल्यभार म्हणतात.

HCL चा सममूल्यभार ३६.५u आहे.

आम्लारीचे जे वजन एक सममूल्यभार हायड्रोक्झिल गट विस्थापित करतो. त्या वजनास आम्लारीचा सममूल्यभार असे म्हणतात.

धातू संयुगाची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन धातूंची हायड्रोक्साइडस तयार होतात. प्रथम गटाच्या धातूच्या हायड्रोक्साइडच्या जलीय द्रावणाला अल्कली आणि इतर धातूच्या हायड्रोक्साइडला आम्लारी म्हणतात.

ज्या द्रवणाची संहती अचूक माहीत असते त्या द्रावणाला प्रमाणित द्रावण म्हणतात.

एक लीटर द्रावणामध्ये किती ग्रॅम सममूल्यभार द्राव्य विरघळले आहे हे दर्शविणारी संख्या म्हणजे त्या द्रावणाची प्रसामान्यता होय.

HCI च्या एक लीटर द्रावणात ३६.५ ग्रॅम HCI असल्यास त्या द्रावणाची प्रसामान्यता 1N असते. HCI च्या एक लीटर द्रावणात ३.६५ ग्रॅम HCI असल्यास त्या द्रावणाची प्रसामान्यता 0.1 N होईल.

प्रसामान्यता (N) = द्राव्याचे ग्रॅममधील वजन /ग्रॅम सममूल्य भार × लीटर मधील आकारमान

दोन किंवा अधिक पदार्थाच्या समांग मिश्रणाला द्रावण म्हणतात.

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

  इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

   सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

   Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

   नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

   Leave a Reply

   Your email address will not be published. Required fields are marked *