Even after waiting the seats of MPSC were like : कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून विविध विभागांची भरती प्रक्रिया जवळपास बंदच होती. यामुळे नोकर भरती थांबल्यामुळे उमेदवारांना वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण वाट पाहूनही एमपीएससीच्या फक्त 290 जागा घोषित करण्यात आल्यामुळे उमेदवारांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याची पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी व मुख्य परीक्षा 7,8 व 9 मे 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
यात गट-अ मध्ये उपजिल्हाधिकारी पदाच्या 12, पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त पदाच्या 16, सहाय्यक राज्यकर आयुक्त 16, गट विकास अधिकारी व तत्सम पदे 15, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा 15, उद्योगा उपसंचालक 4, सहाय्यक कामगार आयुक्त 22, तर ब गटातून उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे 25, कक्ष अधिकारी 39 पदे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, गट विकास अधिकारी 17, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भुमी अभिलेख, उप अधीक्षक व सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क प्रत्येकी 1, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी 16 व सरकारी कामगार अधिकारी 54 असे एकूण 290 जागांसाठी जाहिरात काढण्यात आलेली आहे. पण ही संख्या जास्त असणे गरजेचे होते असे उमेदवारांचे मत आहे.
जागा जास्त येतील असा विश्वास विद्यार्थ्यांना होता; पण पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. अनेक विद्यार्थी जाहिरात येणार म्हणून वाट पाहत होते. दोन्ही वर्षाच्या जागा होत्या. त्यामुळे सहाजिकच जागा जास्त येणे अपेक्षित; *पण तसं काही झालं नाही, अजितदादा शब्दाला पक्के आहेत; पण त्यांचाही आश्वासन फोल ठरलं. त्यामुळे अजितदादा क्या हुआ आपणा वादा हेच म्हणायची वेळ आता विद्यार्थ्यांवर आली आहे, अशी प्रतिक्रिया महेश घरबुडे यांनी उपस्थित केली आहे.