जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल असतो. इतिहास दरवर्षी 7 एप्रिल या दिवशी संघटनेच्या नेतृत्वात जगभरात ‘World Health Day History’ पाळला जातो. या वर्षी म्हणजेच 2020 साली “सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईव्ह्ज” ही या दिनाची संकल्पना आहे. यावर्षीआंतराष्ट्रीय आरोग्य दिन आरोग्य सेवा पुरविण्यात सर्व परिचारिका आणि सुईणींची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका जगापुढे मांडत आहे. त्यांचे कार्यदल बळकट करण्यासाठी जगाला आवाहन करीत आहे.
दिनाचा इतिहास
1948 साली जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) प्रथम ‘जागतिक आरोग्य सभा’ आयोजित केली होती. त्या सभेत दरवर्षी 7 एप्रिल ही तारीख World Health Day म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय वर्ष 1950 पासून प्रभावी करण्यात आला.
प्रत्येक वर्षी जगाचे लक्ष वेधण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय निवडला जातो. विषयनिहाय कार्यक्रमांचे आयोजन आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर केले जाते आणि त्यामधून जनजागृती केली जाते. आंतराष्ट्रीय आरोग्य दिन हा आठ अधिकृत जागतिक आरोग्य मोहिमांपैकी एक आहे. इतर सात मोहिमा – जागतिक क्षयरोग दिन, जागतिक लसीकरण आठवडा, जागतिक मलेरिया दिन, जागतिक तंबाखू विरोधी दिन, जागतिक एड्स दिन, जागतिक रक्तदाता दिन आणि जागतिक हिपॅटायटीस दिन.
सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now