गुणसूत्रे कशाची बनलेली असतात ? Chromosomes
(1) डी.एन.ए. ✅
(2) आर.एन.ए.
(3) पांढर्या रक्तपेशी
(4) हिमोग्लोबिन
Explanation: 👇
✏गुणसूत्राचा शोध हा विसाव्या शतकामधील महत्त्वपूर्ण शोध मानला जातो. सन 1869 मध्ये फेड्रिक मिशर या जीवशास्त्रज्ञाने डी.एन.ए. या आम्लाचा शोध लावला. इ.स. 1953 मध्ये वॉट्सन व क्रिक या शास्त्रज्ञांनी डी.एन.ए.च्या रेणूची प्रतिकृती तयार केली. गुणसूत्रे ही डी.एन.ए.ची बनलेली असतात. डी.एन.ए. म्हणजे डिऑक्सिरायबो न्यूक्लिक अँसिड होय. डी.एन.ए.च्या रेणूची रचना सर्व सजीवांमध्ये सारखीच असते. डी.एन.ए.च्या रेणूखंडांना ‘जीन्स’ असे म्हणतात. हे जीन्स डी.एन.ए.च्या रेणूमधील नायट्रोजनयुक्त पदार्थांच्या निरनिराळ्या रचनेमुळे तयार होतात. जीन्स पेशीच्या आणि शरीराच्या रचनेवर व कार्यांवर नियंत्रण ठेवतात. तसेच ते अनुवंशिक लक्षणे मातापित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात.
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now