मराठी व्याकरण क्रियाविशेषण अव्यये क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणार्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. ज्याप्रमाणे विशेषण हे नामाबद्दलची विशेष माहिती देते, त्याचप्रमाणे क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देते.
मराठी व्याकरण क्रियाविशेषण अव्यये
🌿🌿क्रियाविशेषण अव्ययांचे प्रमुख 2 प्रकार घडतात.🌿🌿
🌿अर्थावरून
🌿स्वरूपावरून
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🌿🌿 अर्थावरून पडणारे प्रकार :🌿🌿
1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय :
कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे 3 प्रकार पडतात.
अ. कालदर्शक –
वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे दर्शविणार्याप शब्दांना ‘कालदर्शक’ क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदा. आधी, आता, सद्य, तूर्त, हल्ली, काल, उधा, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा इत्यादि.
मी काल शाळेत गेलो होतो
मी उदया गावाला जाईन.
तुम्हा केव्हा आलात?
अपघात रात्री झाला.
🌸🌸सातत्यदर्शक –🌸🌸
वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शविणार्या शब्दांना ‘सातत्यदर्शक’ क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदा. नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, अधाप,
पाऊस सतत कोसळत होता.
सुमितचे आजकाल अभ्यासात लक्ष नाही.
पोलिसांना अधाप चोर सापडला नाही
🌿🌿आवृत्तीदर्शक –🌿🌿
वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दर्शविणार्या शब्दांना ‘आवृत्तीदर्शक’ क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदा. फिरून, वारंवार दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा इये.
आई दररोज मंदिरात जाते.
सीता वारंवार आजारी पडते.
फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करत आहात.
संजय क्षणोक्षणी चुकत होता.