मराठी व्याकरण लिंग विचार

मराठी व्याकरण लिंग विचार

मराठी व्याकरण लिंग विचार Marathi Vyakaran Ling Vichar लिंग विचार नामावरून जसे त्याचे लिंग समजते त्या नामाने दर्शवलेली वस्तु एक आहे की त्या वस्तु एकाहून अधिक आहेत हे ही कळते.

नामाच्या ठिकाणी संख्या सु चविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात.

मराठीत दोन वचणे आहेत.

1. एकवचन 2. अनेकवचन

🌿अ. पुल्लिंगी नामाचे अनेक वचन

नियम : 1. ‘आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेक वचन ‘ए’ कारान्त होते.

उदा : 1. मुलगा – मुलगे 2. घोडा – घोडे

3. ससा – ससे 4. आंबा – आंबे

5. कोंबडा – कोंबडे 6. कुत्रा – कुत्रे

7. रस्ता – रस्ते 8. बगळा – बगळे

🌿नियम : 2. ‘आ’ कारान्त शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचे रुपे दोन्ही वचनात सारखीच असतात.

 उदा : 1. देव – देव2. कवी – कवी

3. न्हावी – न्हावी 4. लाडू – लाडू

5. उंदीर – उंदीर 6. तेली – तेली

🌿ब . स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन

🌷नियम : 1. ‘अ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन केव्हा ‘आ’ कारान्त तर केव्हा ‘ई’ कारान्त होते.

 उदा : 1. वेळ – वेळा 2. चूक – चुका

3. केळ – केळी 4. चूल – चुली

5. वीट – वीटा 6. सून – सुना

7. गाय – गायी 8. वात – वाती

🌷नियम : 2. ‘आ’ कारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामांचे अनेकवचन एक वचनासारखेच असते.

उदा : 1. भाषा – भाषा 2. दिशा – दिशा

3. सभा -सभा 4. विध्या – विध्या

🌷नियम : 3. ‘ई’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते.

 उदा : 1. नदी – नद्या 2. स्त्री – स्त्रीया

3. काठी – काठ्या 4. टोपी – टोप्या

5. पाती – पाट्या 6. वही – वह्या

7. बी – बीय8. गाडी – गाड्या

9. भाकरी – भाकर्‍या 10. वाटी – वाट्या

🌷नियम : 4. ‘ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी अनेक वचन ‘वा’ कारान्त होते.

उदा : 1. ऊ – ऊवा 2. जाऊ – जावा

3. पीसु – पीसवा 4. सासू – सासवा

5. जळू – जळवा

अपवाद : 1. वस्तु – वस्तु 2. बाजू – बाजू 3. वाळू – वाळू

🌷नियम : 5. काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात. त्यांचे एकवचन होत नाही.

उदा : 1. कांजीन्या 2. डोहाळे

3. कोरा 4. क्लेश

5. हाल 6. रोमांच

मराठी व्याकरण लिंग विचार

नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात.

मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात.

1. पुल्लिंगी      2. स्त्रीलिंगी       3. नपुसकलिंगी

1.      पुल्लिंगी : मुलगा, शिक्षक, घोडा, चिमणा, सूर्य, चंद्र, सागर, दगड, कागद, पंखा इ.

2.      स्त्रीलिंगी : मुलगी, शिक्षिका, घोडी, चिमणी, खुर्ची, शाळा, नदी, वही, खिडकी, इमारत, पाटी इ.

3.      नपुंसकलिंगी : पुस्तक, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, शहर, घड्याळ, वाहन इ.

लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदल

सर्व मराठी व्याकरण नोट्स पहा किवा डाउनलोड करा Marathi Vyakaran

All Government Jobs Notification Visit Now For Free Online Mock Test Solve Now For Latest Govt Jobs Notification Visit Now Free Online Live Video Lectures Watch Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *