मराठी व्याकरण शब्दयोगी अव्यय

मराठी व्याकरण शब्दयोगी अव्यय

मराठी व्याकरण शब्दयोगी अव्यय नामांना जोडून येणा-या अव्ययांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. जी अव्यये नाम, सर्वनाम किंवा तत्सम शब्द यांना जोडून येतात आणि त्यांचा (वाक्यातील) इतर शब्दांशी संबंध दर्शवितात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.  

शब्दयोगी अव्यव नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणार्‍या शब्दाला जोडूनच येतात.    

शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येतात असे असले तरी शब्दयोगी अव्यय क्रियापद आणि क्रियाविशेषण यांनाही कधी कधी जोडून येतात.जसे येईपर्यंत, बसल्यावर, जाण्यापेक्षा, बोलण्यामुळे परवापासून, यंदापेक्षा, केंव्हाच, थोडासुद्धा इत्यादी.       

उदा:     

टेबलाखाली   

वरील वाक्यात खाली हा शब्द अव्यय आहे.          

🌷🌷शब्दयोगी अव्ययाचे प्रकार 🌷🌷       

१. कालवाचक  

अ. काल कामाला सुट्टी होती.

आ. मी दररोज अभ्यास करतो.     

वरील वाक्यातील काल, दररोज हे शब्द त्या त्या वाक्यातील क्रिया केव्हा, किती वेळा घडली हे दाखवतात. ही अव्यये क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवितात; म्हणून त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात.         

कालवाचक अव्ययवाचे दोन प्रकार पडतात.  

🌷🌷अ) कालदर्शक :-      🌷🌷

पावेतो, नंतर, आधी, पुढे, पूर्वी इ.              

उदा.

१) आज पावेतो मी आंबा खाल्ला नाही.

२) यापुढे मी जाणार नाही.

३) सकाळनंतर मी तिकडे जाणार आहे.        

🌷🌷ब) गतिवाचक :-  🌷🌷

पासून, पर्यंत, मधून, खालून, आतून इ.        

उदा :

अ) कालपासून माझी परीक्षा सुरू झाली.

आ) उद्या पर्यंत ते दुकान बंद राहील.        

🌷🌷२. स्थलवाचक –    🌷🌷      

अ. परमेश्वर सर्वत्र असतो.                   

आ. येथून घर जवळ आहे.                          

वरील वाक्यातील सर्वत्र, येथून हे शब्द वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थळ लिंवा ठिकाण दाखवितात; म्हणून त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात.          

🌷🌷३. करणवाचक – 🌷🌷

करवी, योगे, हाती, द्वारा, कडून, मुळे इ.        

उदा.  

१. सावलीमुळे कपडे लवकर वाळत नाही.

२. सिंहाकडून हरिण मारले गेले.

४. व्यतिरेक वाचक

🌷🌷४. व्यतिरेकवाचक –  🌷🌷      

विना, शिवाय, खेरीज, परवा, वाचून, व्यतिरिक्त इ.          

उदा.  

१. तुझ्याशिवाय मला करमत नाही.

२. त्याच्या खेरीज दूसरा कोणताही चालेल.      

🌷🌷४. व्यतिरेकवाचक –🌷🌷        

विना, शिवाय, खेरीज, परवा, वाचून, व्यतिरिक्त इ.          

उदा.  

१. तुझ्याशिवाय मला करमत नाही.

२. त्याच्या खेरीज दूसरा कोणताही चालेल.          

🌷🌷५. हेतुवाचक –   🌷🌷      

कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त, स्थव इ.          

उदा.  

१. यश मिळविण्याकरिता मेहनत लागते.

२. जगण्यासाठी अन्न हवेच.      

🌷🌷६. तुलनावाचक –  🌷🌷     

पेक्षा, तर, तम, मध्ये, परिस इ.        

उदा.  

१) माणसांपेक्षा मेंढर बरी.

२) गावामध्ये संजय सर्वात हुशार आहे.           

7. योग्यतावाचक

योग्य, सारखा, जोगा, सम, समान, प्रमाणे, बरहुकूम इ.          

उदा.  

१) तो ड्रेस माझा सारखा आहे.

२) आम्ही दोघे समान उंचीचे आहोत.        

🌷🌷८. कैवल्यवाचक –  🌷🌷      

च, मात्र, ना, पण, फक्त, केवळ इ.          

उदा.  

१) विराटच आपला सामना जिंकवेल.

२) किरण मात्र आपल्या सोबत येणार नाही.    

🌷🌷९. संग्रहवाचक –  🌷🌷          

सुद्धा, देखील, हि, पण, बरिक, केवळ, फक्त इ.        

उदा.  

१) मी देखील त्या कार्यक्रमात सहभागी होईल.

२) रामही भक्तासाठी धावून येईल.

🌷🌷१०. संबंधवाचक – 🌷🌷 

विशी, विषयी, संबंधी इ.             

उदा.  

१) देवाविषयी आपल्या मनात फार भक्ति आहे.

२) त्यासंबंधी मी काहीच बोलणार नाही.      

🌷🌷११. साहचर्यवाचक – 🌷🌷           

बरोबर, सह, संगे, सकट, सहित, सवे, निशी, समवेत इ.       

🌷🌷१२. भागवाचक 🌷🌷–            

पैकी, पोटी, आतून      

🌷🌷१३. विनिमयवाचक –  🌷🌷      

बद्दल, ऐवजी, जागी, बदली इ.      

उदा.  

१) त्याच्या जागी मी खेळतो.

२) सूरजची बदली पुण्याला झाली.         

🌷🌷१४. दिक्वाचक –  🌷🌷    

प्रत, प्रती, कडे, लागी इ.         

उदा.  

१. या पेपरच्या दहाप्रत काढून आण.

२. त्याच्याकडे पैसे दिले आहेत मी.

🌷🌷१५. विरोधवाचक –🌷🌷     

विरुद्ध, वीण, उलटे, उलट इ.        

उदा.  

१) भारताविरुद्ध आज पाकिस्तानची मॅच आहे.

२) त्याने उलट माझीच माफी मागितली.   

🌿नामसाधित शब्दयोगी अव्यय – 

कडे, मध्ये प्रमाणे, पूर्वी, अंती, मुळे, विषयी इ.         

🌿विशेषणसाधित शब्दयोगी अव्यय – 

सम; सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध  इ.

🌿धातुसाधित शब्दयोगी-  

अव्यय करीता, देखील, पावेतो, लागी, लागून इ.  

🌿क्रियाविशेषणसाधित शब्दयोगी अव्यय – 

खालून, मागून, वरून, आतून, जवळून इ.     

🌿संस्कृत शब्दसाधित – 

पर्यंत, विना, समक्ष, समीप, परोक्ष इ.

🌷🌷शुद्ध शब्दयोगी अव्यय –🌷🌷           

च, देखील, ना, पण, मात्र, सुद्धा, हि – अशी शब्दयोगी अव्यय आहेत कि ती शब्दाला जोडून येताना मागील शब्दांची सामान्यरूपे, होत नाहीत, अशा शब्दयोगी अव्ययांना शुद्ध शब्दयोगी अव्यये असे म्हणतात. या शुद्ध शब्दयोगी अव्ययामुळे, मागील शब्दांच्या अर्थास विशेष जोर येतो.

मराठी व्याकरण शब्दयोगी अव्यय Marathi Vyakaran Shabdyogi Avyaye

सर्व मराठी व्याकरण नोट्स पहा किवा डाउनलोड करा

All Government Jobs Notification Visit Now For Free Online Mock Test Solve Now For Latest Govt Jobs Notification Visit Now Free Online Live Video Lectures Watch Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *