कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या अनाथ मुलांना आधार देण्याच्या उद्देशाने 29 मे 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या.
कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक किंवा पालनपोषण करणारे किंवा कायदेशीर पालक / दत्तक पालक मृत्युमुखी पडल्यास त्यांच्या मुलांना ‘पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रेन’ योजनेच्या अंतर्गत पाठिंबा दिला जाईल.
मुलगा किंवा मुलगी 18 वर्षांची झाल्यावर त्या प्रत्येकासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी उभारण्यासाठी विशेष रचना केलेल्या योजनेत ‘पीएम केअर्स’ योगदान देईल.
हा निधी उच्च शिक्षणाच्या कालावधीत त्याची किंवा तिची वैयक्तिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 18 वर्षापासून पुढील पाच वर्षांसाठी मासिक आर्थिक भत्ता / छात्रवृत्ती देण्यासाठी वापरला जाईल आणि 23 व्या वर्षात पदार्पण केल्यावर त्याला किंवा तिला वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी एक रकमी निधीची रक्कम मिळेल.
२०१२ ला दिन साजरा करण्याची घोषणा
थीम २०२१ व २०२० : Appreciate All Parents Throughout The World
थीम २०१९ : Honor Your Parents
१९९४ हे वर्ष ” जागतिक कुटुंब वर्ष “
आर्थिक दुर्बलांसाठीचे आरक्षण मराठा समाजास लागू.
पात्रतेसाठी वार्षिक 8 लाखांपर्यंतच्या उत्पन्नाची अट.
जागतिक दूध दिवस – 1 जून.
1 June 2021 current affairs
जागतिक पालक दिवस – 1 जून.
सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) वृद्धीदर – (-) 7.3 टक्के.
30-31 मे 2021 रोजी _ येथे हवामान बदलाच्या संदर्भात ‘आंतरराष्ट्रीय पी4 शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली – सोल, दक्षिण कोरिया.
जागतिक सीमा शुल्क संघटनेच्या (WCO) सहकार्याने दुबई कस्टम या संस्थेने 25 ते 27 मे 2021 या कालावधीत आयोजित केलेली ‘5 वी WCO जागतिक ऑथराइज्ड इकॉनॉमिक ऑपरेटर (AEO) परिषद’ याची संकल्पना – “Customs-bolstering-Recovery,-Renewal-“and-Resilience-for-a-sustainable-supply-chain”.
भारतीय इंटरनेट व मोबाइल संघ (IAMAI) संस्थेने डिजिटल पब्लिशर्स कंटेंट ग्रीव्हॅन्स काऊंसिल (DPCGC) याची स्थापना करण्याची घोषणा केली.
इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन (IBF) याच्या ‘डिजिटल मीडिया कंटेंट रेग्युलेटरी काऊंसिल’ (DMCRC) या नव्याने तयार झालेल्या स्वयं-नियामक मंडळाचे अध्यक्ष – न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) विक्रमजित सेन.
‘WHO डायरेक्टर-जनरल स्पेशल अवॉर्ड 2021’ याचे प्राप्तकर्ता – डॉ. हर्ष वर्धन (केंद्रीय आरोग्य मंत्री).
केंद्रीय सरकारकडून नेमलेले बँक ऑफ इंडिया (BOI) याचे संचालक – वंदिता कौल (अतिरिक्त सचिव, केंद्रीय अर्थ मंत्रालय).
2021-22 या आर्थिक वर्षासाठी भारतीय उद्योग संघ (CII) याचे नवीन अध्यक्ष – टी. व्ही. नरेंद्रेंन (CEO, टाटा स्टील लिमिटेड).
भारतीय पर्वतारोही ज्याने दुर्मिळ ‘कार्बन न्यूट्रल’ चढाईत एव्हरेस्ट शिखर यशस्वीरित्या गाठले – हर्षवर्धन जोशी (वय 24 वर्ष).
दुबईत ‘आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2021’ स्पर्धेत 75 किलोग्राम वजनी महिला गटात सुवर्णपदकाची विजेती – पूजा राणी.
केरळ विधानसभेने लक्षद्वीप प्रशासकाला परत बोलावण्याच्या मागणीसाठी सर्वानुमते एक ठराव संमत केला, ज्यातून प्रफुल्ल के. पटेल यांना परत बोलावण्याची मागणी करण्यात आली.
1 June 2021 current affairs
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीचे (ममता बॅनर्जी) मुख्य सल्लागार – अलापन बंद्योपाध्याय.
पंजाब सरकारने सार्वजनिक सेवा लोकांच्या दारात पोहचविण्यासाठी “खिदमत आपकी देहलीज पर” कार्यक्रमाचा प्रारंभ केला.
इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) या संस्थेने शेतकऱ्यांसाठी जगातील पहिले ‘नॅनो यूरिया’ सादर केले, ज्यामुळे नॅनो यूरियाची 500 मिलीलीटरची बाटली परंपरागत युरियाच्या एका थैलीची जागा घेणार.
भारतीय तंत्रज्ञान संस्था, रोपार, पंजाब या संस्थेने नाशिवंत उत्पादने, लस, रक्त आणि अवयव यांची ने-आण करताना प्रत्यक्ष तिथल्या तापमानाची नोंद करणारे अशा प्रकारचे ‘अंबीटॅग’ (AmbiTag) नामक पहिले माहिती तंत्रज्ञान उपकरण विकसित केले.
जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर एडवांस्ड सायंटिफिक रिसर्च, बेंगळुरू या संस्थेच्या वैज्ञानिकांनी नवीन आर्टिफिश्यल सिनॅप्टिक नेटवर्क (ASN) यंत्र विकसित केले जे मानवी मेंदूची नक्कल करू शकेल.
IIT, हैदराबाद येथील संशोधकांनी ब्लॅक फंगस (म्यूकोर्मायकोसिस) आणि इतर बुरशीचा उपचार करण्यासाठी तोंडावाटे घेतली जाणारी औषधी विकसित केली
आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय (ICC किंवा ICCt) – स्थापना: 1 जुलै 2002; ठिकाण: हेग, नेदरलँड.
आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटना (ICPO-इंटरपोल) – स्थापना: वर्ष 1923; मुख्यालय: ल्योन, फ्रान्स.