Learn For Dreams
5 June 2020 Current Affairs : 5 June 2021 चालू घडामोडी वाचा ( Chalu Ghadamodi )
5 June 2021 Current Affairs In Marathi PDF (Chalu Ghadamodi)
🌿 जागतिक पर्यावरण दिन 🌿
जागतिक पर्यावरण दिन हा जगभर जून ५ रोजी पाळला जाणारा दिवस आहे
🌿 जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो ? 2021 ची थीम काय आहे?
1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात.
🌿 या वर्षीची थीम काय आहे?
2021 वर्षासाठीची थीम आहे इकोसिस्टीम रिस्टोरेशन (Ecosystem Restoration). म्हणजे परिसंस्थेची हानी रोखत तिचं संतुलन भरून काढण्याचे प्रयत्न करणं.
४३ हजार कोटींचा प्रकल्प
नौदलासाठी देशी बनावटीच्या सहा पारंपरिक सहा पाणबुड्यांची बांधणी करण्याच्या ४३ हजार कोटी रुपयांच्या महाप्रकल्पाला शुक्रवारी संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली.
चीन आपल्या सागरी क्षमतेमध्ये वाढ करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाचे धैर्य वाढविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रातील परदेशी कंपन्यांसमवेत देशी संरक्षण उत्पादकांची सामरिक भागीदारी असावी याबाबत चर्चा सुरू होती त्यानुसार या पाणबुड्यांची बांधणी करण्यात येणार आहे आणि त्यामुळे आयातीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. या महाप्रकल्पाचे ‘पी-७५ इंडिया’ असे नामकरण करण्यात आले असून त्याला संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण संपादन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाची अंमलबजावणी १२ वर्षांत केली जाणार आहे. लार्सन अॅण्ड टुब्रो आणि माझगाव डॉक लि.ला विनंतीप्रस्ताव दिला जाणार आहे.
भारतीय नौदलाची २४ नव्या पाणबुड्या घेण्याची योजना आहे.
सध्या नौदलाकडे १५ पारंपरिक आणि दोन आण्विक पाणबुड्या आहेत.