पाचवी पंचवार्षिक योजना
पाचवी पंचवार्षिक योजना
पाचव्या पंचवार्षिक योजनेची महत्वाची वैशिष्टये
कालावधी – १ एप्रिल १९७४ ते ३१ मार्च १९७९ परंतु ; ही योजना १९७४ ते १९७८ या कालावधीसाठीच राबवण्यात आली.
अध्यक्ष – इंदिरा गांधी
उपाध्यक्ष – दुर्गाप्रसाद धर
प्रतिमान – अलन मन आणि अशोक रुद्र यांच्या खुले सातत्य या प्रतीमानावर आधारित डी. डी. धर यांनी योजना तयार केली होती.
मुख्य भर – दारिद्र्य निर्मुलन आणि स्वावलंबन
उद्दिष्ट्ये – आर्थिक वाढीचा दर ४.४%, दारिद्र्य निर्मुलन, उत्पादक रोजगारात वाढ
प्रकल्प –
- किमान गरजांचा कार्यक्रम – १. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना मोफत व अनुदानित सेवा २. ग्रामीण व शहरी कामगारांची उत्पादक कार्यक्षमता वाढविणे.
विशेष घटनाक्रम –
- २ ऑक्टोबर १९७५ – पहिल्या पाच प्रादेशिक बँका स्थापन
- २ ऑक्टोबर १९७५-७६ – एकात्मिक बाल विकास योजना (ICDS)
- १५ ऑगस्ट १९७६ – भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर
- १९७७ – Housing Development Finance Corporation (HDFC) – हसमुखभाई पारेख यांच्या प्रयत्नाने स्थापन
- १९७६-७७ – दुसऱ्यांदा भारताचा व्यापारतोल अनुकूल
- २ ऑक्टोबर १९७८ -राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम (National Adult Education Programme)
- १७७-७८ – वाळवंट विकास कार्यक्रम (DDP)
- १५ ऑगस्ट १९७९ – स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांचे प्रशिक्षण (TRYSEM)
आर्थिक वाढीचा दर –
- संकल्पित दर – ४.४%
- साध्य दर – ४.७%
- मंद औद्योगिक वाढ – औद्योगिक क्षेत्राचा वार्षिक सरासरी दर ५.३% इतकाच राहिला.
- अन्नधान्य उत्पादन, लागवडीखालील जमीन व सिंचन क्षेत्रात वाढ झाली.
- सतत चलनवाढ होत राहिली. १९५१ ते २०१७ या संपूर्ण कालावधीत सर्वाधिक चलनवाढीचा दर १९७४-७५ मध्ये (सुमारे २५.२%) नोंदवला गेला. त्यामुळे १९७४-७५ हे वर्ष सर्वाधिक तेजीचे वर्ष म्हणून ओळखले जाते.
योजना काळातील राजकीय घडामोडी –
- १८ मे १९७४ – पोखरण येथे पहिली अनुचाचणी. ‘आणि बुद्ध हसला’ या संकेतिक शब्दांनी ही अणुचाचणी ओळखली जाते. या चाचणीचे अभियान प्रमुख राजारामन्ना हे होते.
- २६ एप्रिल १९७५ – सिक्किमचे भारतात विलीनीकरण होऊन त्यास राज्याचा दर्जा देण्यात आला.
- २५ जुन १९७५ – देशात तिसरी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर.
- २६ जून १९७५ – २० कलमी कार्यक्रमास सुरुवात
- मार्च १९७७ – जनता पक्षाचे सरकार आले.
- १ एप्रिल १९७७ – Mini constitution म्हणून ओळखली जाणारी ४२ वी घटनादुरुस्ती लागू करण्यात आली.
- १ एप्रिल १९७८ – पाचवी योजना संपुष्टात आणून जनता सरकारने स्वतः ची सहावी योजना (सरकती योजना) सुरु केली.
- जानेवारी १९८० – कॉंग्रेस (आय) पुन्हे सत्तेवर आली. सरकती योजना फेटाळून १ एप्रिल १९८० ला नवीन सहावी योजना सुरु केली.
अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now