वनरक्षक भरती कोणत्या विभागात किती जागा? ऑगस्ट मध्ये होणार परीक्षा- वनविभाग महाराष्ट्र

वनरक्षक भरती कोणत्या विभागात किती जागा? ऑगस्ट मध्ये होणार परीक्षा- वनविभाग महाराष्ट्र,

कोल्हापूर प्रतिनिधी : शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे व पर्यावरण संवर्धन करणे व पर्यटनाला चालना देणे या बाबत राज्य वनजीव महामंडळ व मंत्रिमंडळची बैठक घेण्यात आली या मध्ये वनविभाग मध्ये 2762 रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या मध्ये वनसर्वेअर,वनरक्षक व व वनमजुर व इतर आवश्यक पदे सप्टेंबर 2022 पर्यंत भरण्याचे आदेश देण्यात आले असून प्रक्रिया लवकरच सुरु करण्यासाठी वनविभागाने तयारी सुरू करावी अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच लवकरात लवकर कंपनी निवड करून परीक्षापूर्व नियोजन अहवाल सादर करावा असे आदेश देण्यात आले आहेत.

वनरक्षक भरती कोणत्या विभागात किती जागा ? ऑगस्ट मध्ये होणार परीक्षा- वनविभाग महाराष्ट्र

वनरक्षक भरती कोणत्या विभागात किती जागा ? ऑगस्ट मध्ये होणार परीक्षा- वनविभाग महाराष्ट्र.

एकूण जागा : 2762 जागा भरण्यात येतील

भरती प्रक्रिया दोन टप्यात न घेता आता एकदम एकाच वेळेस घेण्यात येणार आहे

जाहिरात : जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात

परीक्षा : ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात

निकाल व नियुक्ती : 31 सप्टेंबर 2022 च्या आत

jobtodays.com

वेतनश्रेणी :- 7 व्या वेतन आयोगानुसार

शैक्षणिक पात्रता :
१ खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता ही ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे
२ उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
३ अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
४ माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
५ नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.


ऑगस्ट मध्ये होणार परीक्षा- वनविभाग महाराष्ट्र
टिप:-
नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.

वयोमर्यादा :

१ उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व २५ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.

२ उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षम.

(एक)

महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत ५ वर्षापर्यंत.

(दोन)

माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सुट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील. (सामान्य प्रशासन विभाग शुध्दीपत्रक क्र. मासैक- १०१०/प्र.क्र.२७९/१०/१६-अ, दिनांक २०/८/२०१० )

(तीन)

पात्र खेळाडूच्या बाबत ५ वर्षापर्यंत. (शासन, निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १/७/२०१६)

(चार)

प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता तसेच मागासवर्गीय उमेदवाराकरिता सरसकट कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष राहील. (सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. १००६/मुस.३९६/प्र.क्र.५६/०६/१६-अ, दिनांक ३/२/२००७)

उपलब्ध 2022 नुसार भरण्यात येणार्‍या जागा खालीलप्रमाणे असतील

काही जिल्हयातील पदे अजून जोडले नाहीत त्यांचे पदे उपलब्ध झाल्यावर जोडली जातील.

एकूण जागा : 2762

औरंगाबाद – 40
परभणी – 08
उस्मानाबाद – 20
हिंगोली – 12
बीड – 13
नांदेड – 35
चंद्रपूर – 40
धुळे – 21
नंदुरबार – 20
जळगाव – 19
गडचिरोली – 45
कोल्हापूर – 15
सातारा – 08
सावंतवाडी – 18
सांगली – 09
चिपळूण – 08
नागपूर – 50
वर्धा – 23
भंडारा – 19
गोंदिया – 50
नाशिक – 35
अहमदनगर – 14
पुणे – 24
सोलापूर – 16
ठाणे –
12

जाहिरात शक्यता – जुलै च्या शेवटच्या आठवड्यात
परीक्षा दिनांक – ऑगस्ट महिन्यात

ऑगस्ट मध्ये होणार परीक्षा- वनविभाग महाराष्ट्र
follow this Ooacademy Website Links

2 thoughts on “वनरक्षक भरती कोणत्या विभागात किती जागा? ऑगस्ट मध्ये होणार परीक्षा- वनविभाग महाराष्ट्र

  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *