प्रकाश्याची कार्ये आरसा प्रकार व उपयोग

प्रकाश्याची कार्ये आरसा प्रकार व उपयोग

प्रकाश्याची कार्ये आरसा प्रकार व उपयोग

आपण दररोज वापरतो त्यापैकी सपाट आरशाशी आपला जास्त संबंध आहे.

आरसा हा परवर्तंनशील पृस्ठभाग आहे.

सपाट आरसा म्हणजे सपाट काच असून तिच्या एका पृस्ठभागावर परावर्तक पातळ लेप देऊन त्यावर लाल रंग दिल्याने परावर्तक थराचे संरक्षण केलेले असते.

आरशाचा दूसरा प्रकार म्हणजे वक्र गोलाकार आरसा होय.

तो गोलाकार परवर्तनशील पृष्ठभागाचा एक भाग असतो. त्याचा काटछेद हा वर्तुळपाकळी असतो. काचेच्या एका पृष्ठभागावर परावर्तक लेप देऊन दूसरा पृष्ठभाग चकचकीत केलेला असतो.

अंतर्वक्र आरसा –

जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग चकचकीत असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा म्हणतात.

आतल्या पृष्ठभागावरून परावर्तन होते. त्यालाच अभिसारी आरसा म्हणतात.

कारण मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर एका बिंदुजवळ अभिसारीत होतात.

बहिर्वक्र आरसा –

·🌷         जर गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग चकचकीत असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा म्हणतात.

· 🌷        बाहेरचा पृष्ठभागावरून परावर्तन होते. 

· 🌷        मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर अपसारीत होत असल्याने या आरशाला आपसरी आरसा असे म्हणतात.

🌷गोलीय आरसा ज्या गोलापासून बनविला आहे, त्या गोलाच्या केंद्रबिंदूला (C) आरशाचे वक्रता केंद्र म्हणतात.

🌷बहिर्वक्र आरशाला अपसारी आरसा असेही म्हणतात.

🌷ज्या प्रतिमेतून प्रकाशाचे वास्तव अभिक्रमन होते व तेथून पुढे प्रकाश अपसृत होतो ती वास्तव प्रतिमा तर ज्या प्रतिमेतून प्रकाश अपसृत होण्याचा भास होतो ती आभासी प्रतिमा.

🌷वाहनाच्या चालकासाठी बहिर्वक्र आरसा असतो.

🌷बहिर्वक्र आरशाने वस्तूपेक्षा लहान व सुलट प्रतिमा तयार होतात.

🌷दाढी करताना वापरावयाचा आरसा हा अंतर्वक्र आरसा असतो.

🌷या आरशामध्ये सुलट आणि मोठी प्रतिमा दिसते आणि दाढी करणे सोयीचे होते.

🌷प्रकाशाच्या आपतन दिशेतील सर्व अंतरे धन तर विरुद्ध दिशेतील अंतरे ऋण मोजली जातात.

🌷वस्तू नेहमी आरशाच्या डाव्या बाजूला ठेवलेल्या असतात. म्हणजे प्रकाशाची अपतनाची दिशा डावीकडून उजवीकडे असेल.

🌷आरशापासून वस्तूचे अंतर u आणि प्रतिमेचे अंतर v यांचे आरशाचे नाभीय अंतर व वक्रता त्रिजेशी संबंध दर्शविणारे सूत्र म्हणजेच आरशाचे सूत्र होय.

🌷सूत्र : 1/u + 1/v = 1/f =2/R

🌷बहिर्वक्र आरशाने नेहमीच सुलट आणि आभासी प्रतिमा तयार होते. ही प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा लहान असते.

🌷अंतर्वक्र आरशासमोर त्याच्या नाभीय अंतरापेक्षा कमी अंतरावर वस्तू ठेवल्यास तिची आभासी, सुलट आणि वस्तूपेक्षा मोठ्या आकाराची प्रतिमा दिसते.

🌷जर वस्तूचे आरशापासूनचे अंतर नाभीय अंतरापेक्षा जास्त असेल तर मात्र आंतरर्वक्र आरशाने वास्तव व उलटी प्रतिमा तयार होते.

भौतिकशास्त्र विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *