मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच

मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच MPSC Marathi Vyakran 3 Marathi Grammer Test Series 3 Mock Test, मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच, सराव प्रन्श्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट सोडवा, मराठी व्याकरण प्रश्नसंच pdf मराठी व्याकरण प्रश्नसंच pdf” “मराठी प्रश्न आणि उत्तर” “मराठी प्रश्नमंजुषा” “पूर्णाभ्यास्त शब्द” “मराठी साहित्य प्रश्नमंजुषा” “प्रश्न उत्तर मराठी” “पूर्णाभ्यस्त शब्द उदाहरण”

मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच

मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच ऑनलाइन टेस्ट स्वरुपात सोडवा व तुमचे गुण तपासा टेस्ट सोडवा

 1. ‘संस्कार’ हा शब्द कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे?

A.  सामासिक

B.  अभ्यस्त

C.  प्रत्ययघटित

D.  उपसर्गघटित

उत्तर  :  D उपसर्गघटीत

स्पष्टीकरण   :    उपसर्ग लागून तयार होणार्‍या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात.वरील उदा. मध्ये कार ला उपसर्ग लागलेला आहे.

 • ‘समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे’ या वाक्याव्दारे व्यक्त होणारा अर्थ कोणता ?

A.  वाच्यार्थ

B.  लक्ष्यार्थ   

C.  तात्पयार्थ

D.  व्यंगार्थ

उत्तर  :  D. व्यंगार्थ

स्पष्टीकरण  :   समाजातील साप   :    ज्यावेळी शब्दांच्या मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करतो तेव्हा शब्दांच्या शक्तीस व्यंजना  असे म्हणतात.

 • ‘झुंबड’ या शब्दाला समानार्थी पर्यायी शब्द शोधा.

A.  झोंबाझोंबी

B.  झांज     

C.  गर्दी

D.  यापैकी कोणताच नाही

उत्तर  :  C. गर्दी

स्पष्टीकरण  :   झुंबड या शब्दाला गर्दी हा समानार्थी शब्द आहे

 • ‘अरी’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द पुढीलपैकी कोणता ?

A.  अमृत   

B.  विष     

C.  सखा   

D.  रवी

उत्तर  :  C.

स्पष्टीकरण  :   अरी म्हणजे शत्रू सखा म्हणजे मित्र

 • ‘पळसाला पाने तीन’ या म्हणीतून कोणते सत्य सूचित केले आहे ?

A.  निसर्गाविषयीचे मानवी आकर्षण     

B.  निसर्ग  :   माणूस यांच्यातील नाते

C.  स्वभावाला औषध नाही    

D.  मानवी स्वभावाची सार्वत्रिकता

उत्तर  :  C. स्वभावाला औषध नाही    

स्पष्टीकरण  :   पळसळा पाने तीनच म्हणजे स्वभावाला औषध नाही. 

 • “मुलांनी मोठया माणसांना दाखवायचा”  :   या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

A.  आदर

B.  प्रेम     

C.  भक्ती

D.  भीती

उत्तर  :  A. आदर

स्पष्टीकरण  :   लहानांनी मोठ्या माणसाप्रती आदर दाखवायचा असतो

 • पर्यायी उत्तरांतील शुध्द जोडशब्द कोणता ?

A.  उधारउसनवार

B.  उधारऊसनवार   

C.  ऊधारउसनवार

D.  उदारउसणवार

उत्तर  :  A.

स्पष्टीकरण  :   व्याकरणदृष्ट्या उधारउसनवार हा शब्द बरोबर आहे.

 • योग्य शब्द लिहा.   :     इ, ए, ऋ हे ………………………… स्वर आहे.

A.   :  हस्व

B.  दीर्घ     

C.  संयुक्त

D.  विजातीय

उत्तर  :  D. विजातीय

स्पष्टीकरण   :    भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.

 • ‘दिक् + मूढ’ यांचा संधी काय होतो  ?

A.  दिक्मूढ

B.  दिग्मूढ   

C.  दिड्मूढ

D.  कोणतेही नाही

उत्तर  :  C. दिड्मूढ

स्पष्टीकरण   :    जवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात

 1. 5) ‘भाववाचक नाम’ ओळखा.

A.  उंची

B.  शरद     

C.  पुस्तक  

D.  झाड

उत्तर  :  A. ऊंची

स्पष्टीकरण  :   ऊंची हे भाववाचक नाम आहे.

 1. अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते?

A.  मागील दार     

B.  पिकलेला आंबा   

C.  असल्या झोपडया   

D.  बनारसी बोरे

उत्तर  :  A. मागील दार

स्पष्टीकरण  :   मागील दार हे अव्यव साधित विशेषण आहे.

 1. ‘तो घोडयास पळवतो’ या वाक्यातील पळवतो या क्रियापदाचा उपप्रकार कोणता ?

A.  शक्य क्रियापद

B.  प्रयोजक क्रियापद 

C.  सिध्द क्रियापद   

D.  सहाय्यक क्रियापद

उत्तर  :  b. प्रयोजक क्रियापद

स्पष्टीकरण  :   जेव्हा एखादी क्रिया दुसर्‍याकडून घडवली जाते तेव्हा प्रयोजक क्रियापद असते

 1. “नक्कीच”  :   हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

A.  गतिदर्शक   

B.  प्रकारदर्शक   

C.  स्थितीदर्शक   

D.  निश्चयदर्शक

उत्तर  :  D. निश्चयदर्शक

स्पष्टीकरण  :   एखादी गोष्ट निश्चितपणे होणार असेल तर निश्चयदर्शक क्रियापद असते.

 1. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

     ‘स्तव’

A.  हेतूवाचक   

B.  संबंधवाचक   

C.  विरोधवाचक   

D.  स्थलवाचक

उत्तर  :  A. हेतुवाचक

स्पष्टीकरण  :   स्तव म्हणजे कारणाने. येथे हेतुवाचक क्रियापद आहे.

 1. समुच्चयबोधक संयुक्त वाक्य बनवितांना कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा वापर होतो.

A.  म्हणून, तस्मात 

B.  आणि, व   

C.  परंतु, परी  

D.  कारण, की

उत्तर   :    B.  आणि, व

स्पष्टीकरण  :   दोन प्रधान किंवा मुख्य वाक्ये व, अन्, शिवाय यांसारख्या उभयान्वयी अव्ययांनी जोडून त्याचा मिलाफ किंवा समुच्चय करतात अशा उभयान्वयी अव्ययांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

 1. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

A.  पाटील   

B.  सोमवार   

C.  श्रीमंत     

D.  पौरुषत्व

उत्तर  :  D. पौरुषत्व

स्पष्टीकरण   :    ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो त्याला ‘भाववाचक नाम’ असे म्हणतात.

 1. ‘हा  :   ही  :   हे’, ‘तो  :   ती  :   ते’, ही कोणत्या सर्वनामाची उदाहरणे होत ?

A.  सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे     

B.  संबंधी सर्वनामे

C.  प्रश्नार्थक सर्वनामे       

D.  दर्शक सर्वनामे

उत्तर  :  D. दर्शक सर्वनामे

स्पष्टीकरण  :   जवळची किवे दूरची वस्तु दर्शवन्यासाठी दर्शक सर्वनाम वापरले जाते.

 1. अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.

     ‘राम एकवचनी राजा होता.’

A.  नामसाधित क्रियापद

B.  प्रयोजक क्रियापद

C.  सर्वनामिक क्रियापद

D.  समासघटित विशेषण

उत्तर  :   D. समासघटित विशेषण

स्पष्टीकरण   :    

 1. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.

     मला आता काम करवते.

A.  शक्य क्रियापद   

B.  भावकर्तृक क्रियापद   

C.  अनियमित क्रियापद   

D.  साधे क्रियापद

उत्तर  :  A. शक्य क्रियापद

स्पष्टीकरण  :   वाक्यामधील ज्या क्रियापदाव्दारे कर्त्याच्या ठिकाणी क्रिया करण्याचे सामर्थ्य व्यक्त होते किंवा कर्त्याकडून ती क्रिया करण्याची शक्यता व्यक्त होतेत्यास शक्य क्रियापदे म्हणतात.

 • क्रियाविशेषण अव्यये ही :

   अ) क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात.    ब) क्रियाविशेषण विकारी असतात.

   क) एका वाक्याची दुस  :   या वाक्याशी सांगड घालतात.

A.  फक्त अ बरोबर  

B.  फक्त क बरोबर   

C.  अ आणि ब बरोबर   

D.  अ आणि क बरोबर

उत्तर  :   C. अ आणि ब बरोबर   

स्पष्टीकरण   :      क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात.  क्रियाविशेषण विकारी असतात.

 • अचूक विधाने निवडा.

   अ) च, ना, पण, मात्र हे शब्द शब्दयोगी अव्यये आहेत.

   ब) च, ना, पण, मात्र हे कैवल्य वाचक शब्दयोगी अव्यये आहेत.

A.  फक्त अ अचूक   

B.  फक्त ब अचूक   

C.  दोन्ही अचूक

D.  दोन्ही चूक

उत्तर  :  C. दोन्ही अचूक

स्पष्टीकरण   :             अ) च, ना, पण, मात्र हे शब्द शब्दयोगी अव्यये आहेत.

                    ब) च, ना, पण, मात्र हे कैवल्य वाचक शब्दयोगी अव्यये आहेत.

 • उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.  :   ‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.’

A.  विकल्पबोधक   

B.  समुच्चयबोधक   

C.  न्युनत्वबोधक     

D.  परिणामबोधक

उत्तर  :  B. समुच्चय बोधक

स्पष्टीकरण  :   आणि हे समुच्चय बोधक उभयान्वयि अव्यय आहे.

 • चुप, चुपचाप, गप, गुपचित, बापरे

      वरीलपैकी किती मौनदर्शक अव्यये आहेत.

A.  चार     

B.  पाच     

C.  तीन     

D.  एक

उत्तर  :  A. चार

स्पष्टीकरण   :    चुप, चुपचाप, गप, गुपचित हे मौन दर्शक अव्यय आहेत.

 • ‘मी निबंध लिहितो’ अपूर्ण भविष्यकाळ करा.

A.  मी निबंध लिहिला   

B.  मी निबंध लिहित जाईन

C.  मी निबंध लिहित असेन 

D.  वरील एकही पर्याय योग्य नाही

उत्तर   :    C.  मी निबंध लिहित असेन 

स्पष्टीकरण  :   लिहीत असेल भविष्यकाळी अपूर्ण रूप आहे.

 • ‘विव्दान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

A.  पंडिता   

B.  विदुषी     

C.  हुषार     

D.  यापैकी काहीही नाही

उत्तर   :    B.  विदुषी

स्पष्टीकरण  :   विदुषी हे विद्वान चे स्त्रीलिंगी रूप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *