लायगो गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रे माहिती

लायगो गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रे यंत्रे माहिती Ligo-Gravitational-Waves-Research

गुरुत्वीय लहरींच्या शोधासाठी वापरण्यात आलेली दोन लायगो गुरुत्वीय लहरी शोधक यंत्रे पुन्हा सुरू करण्यात आली असून आगामी काळातील विश्वातील आणखी काही कृष्णविवरांच्या टकरी व त्यातून निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध घेण्यात यश येईल अशी आशा आहे.

 लायगो शोध उपकरणांमध्ये लेसर, इलेक्ट्रॉनिक व ऑप्टिक्स (प्रकाशशास्त्र) पातळीवर काही बदल करण्यात आले असून त्यांची संवेदनशीलता १० ते २५ टक्के वाढवली आहे. ही शोधक यंत्रे आता विश्वात अतिशय दूरवरच्या खगोलीय घटनातून निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा वेध घेऊ शकतील.

गेल्या वर्षी १४ सप्टेंबरला लेसर इनफेरोमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी डिटेक्टर्स म्हणजे लायगो उपकरणांनी प्रथमच गुरुत्वीय लहरी शोधल्या होत्या. ही दोन लायगो डिटेक्टर उपकरणे एकमेकांपासून ३००० कि.मी अंतरावर असून त्यात अनेक सुधारणा आता केल्या असून त्यांची संवेदनशीलता वाढवण्यात आली आहे.

त्यावेळी पकडण्यात आलेला संदेश हा गुरुत्वीय लहरींचा होता व त्या लहरी १.३ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या दोन प्रचंड वस्तुमानाच्या कृष्णविवरांच्या विलयातून तयार झाल्या होत्या. त्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे २६ डिसेंबरला गुरुत्वीय लहरींचा आणखी एक संदेश टिपण्यात यश आले होते व दुसऱ्या कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या त्या गुरुत्वीय लहरी होत्या, ती घटना १.४ अब्ज प्रकाशवर्षे दूरवर घडली होती.

लायगो उपकरणातील सुधारणांमुळे आता गुरुत्वीय लहरी जास्त प्रमाणात शोधता येतील असे वैज्ञानिकांना वाटते. लायगो उपकरणे ही वॉशिंग्टन व लुईझियाना येथे असून त्यांचे एकमेकांपासूनचे अंतर ३००० कि.मी आहे. ही उपकरणे ६६० दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झालेल्या गुरुत्वीय लहरी शोधू शकतात. ही क्षमता आता २५ टक्के वाढली आहे असे लायगोचे प्रमुख वैज्ञानिक पीटर फ्रिटशेल यांनी सांगितले.

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

  इतर महत्वाच्या लिंक्स

  सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

  Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

  नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *