जगातील पहिला सोलार महामार्ग फ्रान्सने बनवला

जगातील पहिला सोलार महामार्ग फ्रान्सने बनवला

जगातील पहिला सोलार महामार्ग फ्रान्सने बनवला

फ्रान्सने जगातील पहिला सोलार महामार्ग बनवला आहे. जगातील पहिला सोलार महामार्ग फ्रान्सने बनवला या सौरउर्जेचा वापर करून दररोज तीन हजांराहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावाला रोज वीज उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारे अनोखा उपक्रम राबवणारा फ्रान्स हा जगातील पहिलाच देश आहे.

आपल्या देशातील वीजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी फ्रान्सने अनोखा उपक्रम राबवला आहे. या देशाने सोलार पॅनल बसवलेला मोठा महामार्ग तयार केला आहे. यातून तयार होणा-या उर्जेचा वापर करून जवळपास साडेतीन हजार लोकांना रोज विद्युत पुरवठा उपलब्ध होणार आहे. दोन वर्षांपूर्वीच हा रस्ता तयार करण्यात आला होता मात्र या रस्त्यात कोणत्याही त्रुटी भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या. या मोठ्या महामार्गावर २ हजार ८८० सोलार पॅनल बसवण्यात आले आहे. अक्षय उर्जेचा वापर करून असा अनोखा उपक्रम राबवल्याबद्दल फ्रान्सचे कौतुक होत आहे.

हा महामार्ग आजपासून खुला करण्यात आला आहे. हा महामार्ग अत्यंत मजबूत असल्याचे फ्रान्स सरकारने सांगितले आहे. पण तरीही या महामार्गावरून अवजड वाहाने गेलीच तर मात्र या सोलार पॅनलला मोठे नुकसान पोहचू शकते अशी भिती अनेकांनी व्यक्त केली आहे. या महामार्गामुळे एका गावाला रोज विजपुरठा होऊ शकतो असे फ्रान्सने सांगितले आहे. पण अनेकांनी या महामार्गाला विरोध केला आहे. फ्रान्स सरकारने हा सोलार महामार्ग बनवण्यासाठी अवाजवी खर्च केला असल्याचे अनेकांचे मत आहे. इतका खर्च करण्यापेक्षा सरकारने रस्ते दुरूस्त करायला हवे होते असेही मत व्यक्त करत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्यामुळे वर्षभर २८० मेगाव्हॅट विद्युत निर्मिती होईल असा दावा सरकारने केला आहे. जर्मनी, नेदरलँड आणि अमेरिकेतही असा प्रयोग केला जाणार आहे.

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या लिंक्स

    सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

    Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

    नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

    France built the world’s first solar highway,

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *