23 April 2020 चालू घडामोडी PDF डाउनलोड करा
मुंबई उच्च न्यायालयाचे पुढील मुख्य न्यायामूर्ती म्हणून न्या. दीपंकर दत्ता यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने शनिवारी केली.
न्या. दत्ता सध्या कोलकाता उच्च न्यायालयात ज्येष्ठतम न्यायाधीश आहेत. ते बढतीवर मुंबईत मुख्य न्यायाधीश म्हणून येतील.
तसेच ‘कॉलेजियम’ची ही शिफारस आता केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाकडे जाईल व त्यानंतर न्या. दत्ता यांच्या नव्या नेमणुकीचे आदेश निघतील.तर सध्याचे मुख्य न्यायाधीश न्या. भूषण धर्माधिकारी येत्या 27 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत.
उत्तरप्रदेशातल्या समुदायिक स्वयंपाकगृहांना ‘जियोटॅग’ प्रदान करण्यात आले आहे, ज्यामुळे तयार झालेले अन्न कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आले आहे त्याविषयी माहिती उपलब्ध होते.
इतर ठळक बाबी
‘जियोटॅग’ सेवा मिळविण्यासाठी राज्य सरकारने गुगलकंपनीसोबत करार केला आहे.
राज्यातल्या 75 जिल्ह्यातल्या 7,368 स्वयंपाकगृहांमध्ये दिवसाला सुमारे 12 लक्ष्य डब्बे तयार केले जात आहेत. एकूण समुदायिक स्वयंपाकगृहांपैकी 668 धार्मिक संस्था आणि अशासकीय संस्था चालवित आहेत.
भारताच्या ISROच्या रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर या संस्थेनी संचारबंदीच्या काळात जागोजागी अडकलेल्या गोरगरिबांना वेळेवर भोजन मिळावे त्याकरिता कार्यरत असलेल्या स्वयंपाकगृहांची भौगोलिक माहिती प्राप्त करण्यासाठी एक अनुप्रयोग विकसित केले आहे, जेणेकरून स्वयंसेवेचे व्यवस्थापन करता येणार आहे.
◾️ 24 एप्रिल ◾️ 2010 पासून ◾️ 73 वी घटनादुरुस्ती कायदा 1992 अंमलबजावणी : 24 एप्रिल 1993 ला अंमलबजावणी
◾️ 73 व्या घटनादुरुस्तीने पंचायत राजला संविधानिक दर्जा दिला ◾️ कलम 243 ते 243 (O)
कलम 40: राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे ◾️ परिशिष्ट 11: पंचायती राजच्या 29 विषयांचा समावेश आहे.
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now