Learn For Dreams
Sanyukat Maharashtra Chalval: संयुक्त महाराष्ट्र चळवळ प्रश्नपत्रिका
Q : इ. स.1946 मध्ये बेळगाव येथे 20 वे मराठी साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनाचे अध्यक्ष__ यांनी 12 मे 1946 रोजी संयुक्त महाराष्ट्रासंबंधी एक ठराव मांडला होता?
(अ) यशवंतराव चव्हाण
(ब) ग. त्र्यं. माडखोलकर
(क) विठ्ठल वामन ताम्हणकर
(ड) यापैकी नाही
Q : संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष शंकरराव देव हे काँग्रेस नेते असल्याने, संयुक्त महाराष्ट्र परिषद भरीव स्वरूपाची कृती करू शकणार नाही, असे मत कोणी मांडले?
(अ) बाबासाहेब आंबेडकर
(ब) भाई डांगे
(क) ग. त्र्यं. माडखोलकर
(ड) अ आणि ब दोन्ही बरोबर ✅✅
Q : _यांच्या बलिदानाने ऑक्टोबर 1953 मध्ये आंध्र प्रदेशाची निर्मिती झाली?
(अ) पट्टीश्रीरामालू ✅✅
(ब) भाई डांगे
(क) बाबू गेनू
(ड) यापैकी नाही
पट्टीश्रीरामालू यांच्या बलिदानाने ऑक्टोबर 1953 मध्ये आंध्र प्रदेशाची निर्मिती झाली. त्याचप्रमाणे सरकारने राज्य पुनर्रचना आयोगाची नेमणूक केली.
Q : राज्य पुनर्रचना आयोगाची शिफारस- फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाने 10 ऑक्टोबर 1955 रोजी आपला अहवाल सादर केला. या अहवालातील अयोग्य तरतूद कोणती?
(अ) या समितीने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व गुजरात या मागण्या फेटाळल्या.
(ब) विदर्भाचे स्वतंत्र राज्य करावे असे सुचवले.
(क) उरलेल्या मराठी व गुजराती भाषिकांचे संतुलित असे द्विभाषिक राज्य निर्माण करावे असे सुचवले.
(ड) वरील सर्व बरोबर ✅✅
Q : 16 जानेवारी 1956 रोजी_ यांनी मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असेल अशी घोषणा केली?
(अ) यशवंतराव चव्हाण
(ब) ग. त्र्यं. माडखोलकर
(क) मोरारजी देसाई
(ड) जवाहरलाल नेहरू✅✅
Q : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व घटनेचा निषेध म्हणून भारताचे अर्थमंत्री__ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला?
(अ) मोरारजी देसाई
(ब) शंकरराव चव्हाण
(क) यशवंतराव चव्हाण
(ड) सी. डी. देशमुख✅✅
सी. डी. देशमुख- कार्यकाळ 01 जून 1950 ते 24 जुलै 1956
Q :01 नोव्हेंबर 1956 रोजी अस्तित्वात आलेल्या द्वैभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
(अ) मोरारजी देसाई
(ब) शंकरराव चव्हाण
(क) यशवंतराव चव्हाण ✅✅
(ड) सी. डी. देशमुख
विशाल द्वैभाषिक राज्याच्या योजनेला विरोध करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने मुंबई येथे 29 व 30 सप्टेंबर 1956 रोजी भाऊसाहेब राऊत यांच्या अध्यक्षतेखाली एक परिषद बोलविण्यात आली.
द्वैभाषिक मुंबई राज्यात कच्छ, सौराष्ट्र या गुजराती भाषिक प्रदेशांबरोबरच हैद्राबाद संस्थानातील मराठी भाषिकांचा मराठवाडा हा भाग तसेच मध्य प्रदेशातील विदर्भ किंवा वऱ्हाड हा भाग अंतर्भूत करण्यात आला. त्याच वेळी बेळगाव, विजापूर, कानडा आणि धारवाड जिल्ह्य़ातील कन्नड भाषिक प्रदेश मुंबई राज्यातून काढण्यात येऊन तत्कालीन म्हैसूर राज्यात अंतर्भूत करण्यात आला.
Q : नागपूर करार केव्हा करण्यात आला होता?
(अ) 1951
(ब) 1952
(क) 1953✅✅
(ड) 1954
विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील नेत्यांनी 28 सप्टेंबर 1953 रोजी नागपूर करारावर स्वाक्षरी केल्या.
Q : _ रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये अस्तित्वात आली?
(अ) 01 मे 1953
(ब) 28 सप्टेंबर 1953
(क) 01 मे 1960 ✅✅
(ड) 01 नोव्हेबंर 1956
Q : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खालीलपैकी कोणत्या पक्षांनी सहभाग घेतला होता?
(अ) शेतकरी कामगार पक्ष
(ब) प्रजासमाजवादी पक्ष
(क) कम्युनिस्ट पक्ष
(ड) शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन
(इ) जनसंघ
(ई) हिंदू महासभा
(फ) वरील सर्व✅✅
Q : ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती __या प्रमाणावर नव्हती?
(अ) आर्थिक
(ब) भाषिक ✅✅
(क) सामाजिक
(ड) प्रशासकीय धोरण
परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती
Q : इ. स. 1920 रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा कोणी मान्य केला होता?
(अ) पं. जवाहरलाल नेहरू
(ब) महात्मा गांधी ✅✅
(क) मदनमोहन मालवीय
(ड) डॉ. राजेंद्र प्रसाद
लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते.
Q :28 नोव्हेंबर 1949 रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव _ यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’ चा ठराव शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या (Scheduled Caste Federation) वतीने मांडला?
(अ) आचार्य अत्रे व स.का.पाटील
(ब) आचार्य अत्रे व डॉ. आर.डी. भंडारे✅✅
(क) स.का.पाटील व लोकमान्य टिळक
(ड) वरील सर्व
Q : खालीलपैकी कोणी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान भुषविला होता?
(अ) स.का.पाटील
(ब) डाॅ. आर.डी. भंडारे ✅✅
(क) श्रीपाद डांगे
(ड) एस.एम. जोशी