Learn For Dreams
न्यूटनचे गतीचे नियम Newton’s Law of Motion
🌿न्यूटनचे गतीचे नियम🌿
♦️भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे तीन नियम हे अभिजात यांत्रिकीचे मूलभूत नियम आहेत.
♦️हे नियम वस्तू आणि त्या वस्तूवर कार्य करत असणारी बले आणि या बलांमुळे वस्तूची होणारी हालचाल यातील संबंधांचे वर्णन करतात.
हे नियम खालीलप्रमाणे आहेत.
🌸🌸पहिला नियम🌸🌸
♦️: जडत्वीय संदर्भचौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू , जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने पहिला नियम करत राहाते.
♦️दुसरा नियम: बल = वस्तुमान x त्वरण. वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकाराइतकी असते.
🌺तिसरा नियम: 🌺
जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.
🌴महत्त्वाचे🌴
न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्ताच्या अणि या नियमांच्या साहाय्याने न्यूटनने केपलरचे ग्रहांच्या गतीचे नियम सिद्ध केले.
यामुळे न्यूटनचे नियम फक्त पृथ्वीपुरते मर्यादित नसून सार्वत्रिक आहेत हे स्पष्ट झाले.
तत्त्वतः न्यूटनचे नियम हे फक्त जडत्वीय संदर्भचौकटीतच वैध आहेत.
तसेच ज्या वस्तूवर हे नियम वापरले जातात ती वस्तू बिंदुस्वरूप आहे असे गृहीत धरले जाते.
पृथ्वीचे स्वतः भोवती व सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचे परिणाम सूक्ष्म असल्याने पृथ्वीला जडत्वीय संदर्भचौकट मानून हे नियम रोजच्या जीवनात वापरता येतात.
आधुनिक भौतिकशास्त्रामध्ये, संवेग अक्षय्यता, ऊर्जा अक्षय्यता आणि कोनीय संवेग अक्षय्यता या जास्त व्यापक संकल्पना म्हणून मान्यता पावल्या आहेत
. बल ही संकल्पना आणि न्यूटनचे नियम या गोष्टी आधुनिक भौतिकीमध्ये वापरले जात नाहीत.
त्याऐवजी संवेग, ऊर्जा आणि कोनीय संवेग या गोष्टींना मूलभूत मानून काम केले जाते.
🌿🌿इतिहास🌿🌿
प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल याचा भौतिक पदार्थांच्या हालचालींसंबंधीचा दृष्टिकोन आजच्या आपल्या दृष्टिकोनापेक्षा अतिशय वेगळा होता.
ॲरिस्टॉटलचे असे म्हणणे होते की जड वस्तूंना (उदा. दगड) पृथ्वीवर स्थिर राहायला आवडते आणि धुरासारख्या हलक्या वस्तूंना वर आकाशात जाउन स्थिर व्हायला आवडते.
याखेरीज तारकांना अंतराळातच राहायला आवडते.
ॲरिस्टॉटलनुसार प्रत्येक पदार्थाची नैसर्गिक स्थिती ही त्याची स्थिर स्थिती असते आणि पदार्थाला सरळ रेषेत स्थिर वेगात मार्गक्रमित ठेवण्यासाठी दुसऱ्या एखाद्या साधनाची गरज असते.
ॲरिस्टॉटलचा हा दृष्टिकोन कोणत्याही वैज्ञानिक पद्धतीवर अवलंबून नव्हता.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
♦️♦️घिसड (भौतिकी♦️♦️
भौतिकीत “घिसड” हे परिमाण म्हणजे जोरचे कालसापेक्ष भैदिज किंवा वस्तुमान गुणिले धक्का होय. हे परिमाण संवेगाचे तिसरे कालसापेक्ष भैदिजसुद्धा आहे. ह्या परिमाणासाठी अधिकृत अशी जगमान्य संज्ञा नसली, तरी घिसड ही संज्ञा सामान्यपणे वापरली जाते.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now
Newton’s che Gativishayk Niyam