Learn For Dreams
Mpsc PSI Exam Information Maharashtra Public Service Commission
पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम
अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. पण अशा संयुक्त पूर्व परीक्षेचे हे दुसरेच वर्ष आहे. PSI, STI U Assistant (ASO) या तिन्ही पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम समानच असल्यामुळे या पदांसाठी सन २०१४पासून झालेल्या सर्व पूर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि गेल्या वर्षीची संयुक्त पूर्व परीक्षा यांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तयारीला दिशा मिळण्यासाठी उपयोगी पडेल. जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करताना प्रत्येक प्रश्न वाचून त्याबाबत काही मंथन करणे आवश्यक आहे.
हा प्रश्न का विचारला आहे; तो अभ्यासक्रमाच्या कोणत्या घटकावर आधारित आहे; त्यातील मुद्दे अभ्यासक्रमातील दुसऱ्या कोणत्या घटकांशी संबंधित आहेत का आणि या घटकाच्या कोणकोणत्या पलूंवर प्रश्न विचारता येतील यावर विचार करायला हवा. या विश्लेषणाच्या आधारावर अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागावर किती आणि कशा स्वरूपाचे प्रश्न आले आहेत ते समजून घेणे आणि याबाबत आयोगाच्या अपेक्षा समजून घेणे शक्य होते.
त्या आधारे अभ्यासक्रमातील कोणत्या घटकावर जास्त भर द्यायचा, कोणत्या घटकावर कमी कष्ट घेतलेले चालतील याचा अंदाज येते आणि अभ्यासाची दिशा व नियोजन निश्चित करता येते.
या दृष्टीने राष्ट्रचेतना प्रकाशनाचे दुय्यम सेवा अभ्यास प्रश्नपत्रिका हे पुस्तक विश्लेषण आणि सराव दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल. या परीक्षेच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात व प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात.
प्रत्येक पदासाठी उपलब्ध एकूण पदसंख्येच्या सुमारे आठ पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील अशा रीतीने पूर्व परीक्षेच्या गुणांची सीमारेषा निश्चित करण्यात येते. या सीमा रेषेवर ज्या विद्यार्थ्यांचे एकूण गुण असतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश मिळतो.
फ्री ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा
MPSC परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा