Learn For Dreams
इतिहासातील वृत्तपत्रांच्या संपादकांची नावे व त्यांनी काढलेली वृत्तपत्रे,पक्षिके,मासिके इत्यादि. मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र २० जुलै इ.स. १८२८ रोजी सुरू झाले. त्यावेळची ‘बॉम्बे गॅझेट’, ‘बॉम्बे कुरियर’ ही इंग्रजी व ‘मुंबईना समाचार’ हे गुजराती पत्र होते. तरीही मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरू करण्याचा मान ‘दर्पण’या साप्ताहिक वृत्तपत्रासच जातो.
भारतीय वा देशी भाषांतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभही बंगालमध्ये झाला. १८१६ साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरु केले. कलकत्त्याजवळील श्रीरामपूरच्या मिशनऱ्यांनी समाचार-दर्पण सुरु केले (१८१८-४१). हिंदी भाषेचे टंकही श्रीरामपूर मिशननेच प्रथम पाडले. या मिशनने मिशन समाचार-दर्पण या साप्ताहिकाचे प्रकाशन सुरु केले. धर्मप्रचाराचा भाग म्हणूनही मिशनचीही नियतकालिके चालविली जात. सरकारी कारभारावरही त्यात टीका असे. त्यात प्रसिद्ध होणारे हिंदू धर्माविषयीचे लेखन मात्र आक्षेपार्ह आहे. १८२१ मध्ये समाचार चंद्रिका हे पत्र निघाले. सामाजिक प्रश्नांत ते पुराणमताभिमानी दृष्टिकोण प्रकट करी. भवानीचरण बॅनर्जी यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र ४ डिसेंबर १८२१ रोजी सुरु केले. ‘धार्मिक, नैतिक व राजकीय विषय, देशातील अन्य घटना, देशी व परदेशी वार्ता इ. मजकूर कौमुदीत प्रसिद्ध होईल’, असे तिच्या उद्देशपत्रकांत म्हटले होते व जनतेला हार्दिक पाठिंब्याचे आवाहन केले होते. प्रसिद्ध बंगाली नेते व समाजसुधारक ⇨राजा राममोहन रॉय यांचा संवाद कौमुदीशी घनिष्ठ संबंध होता. त्यांचे पत्र म्हणूनच ते ओळखले जाई.
संवाद कौमुदीच्या प्रकाशनाने देशी भाषांतील व विशेषतः बंगाली भाषेतील वृत्तपत्र व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. कलकत्ता जर्नल या नामांकित इंग्रजी पत्राने कौमुदीविषयी प्रशंसापर लेख लिहिला. मात्र एशियाटिक जर्नलसारख्या प्रतिगामी वृत्तपत्राने देशी भाषेतील अशा वृत्तपत्रांच्या उदयाबद्दल नापसंती व्यक्त केली व या घटनेचे परिणाम राज्यकर्त्यांना भोगावे लागतील, असेही बजावले.
नियतकालिके –
मुंबापूर् वर्तमान (१८२८),
दर्पण (१८३२ बाळशास्त्री जांभेकर),
मुंबई अखबार (१८४०),
प्रभाकर (१८४१),
ज्ञानसिंधू (१८४१),
मित्रोदय (१८४४ पुणे),
ज्ञानप्रकाश (१८४९),
ज्ञानोदय (१८४२),
विचारलहरी (१८५२),
वर्तमानदिपिका (१८५३)
मासिके –
दिग्दर्शन (१८४०),
ज्ञानचंद्रोदय (१८४०),
उपदेशचंद्रिका (१८४४),
मराठी ज्ञानप्रसारक (१८५०),
ज्ञानदर्शन (१८५४),
पुणे पाठशाळापत्रक (१८६१),
विविधज्ञानविस्तार (१८६७),
दंभहारक (१८७१)
वृत्तपत्र : संस्थापक
प्रभाकर : भाऊ महाजन
ज्ञानदर्शन : भाऊ महाजन
हिंदू : बी राघवाचार्य
दिनबंधु : कृष्णराव भालेकर
तेज : दिनकरराव जवळकर
निंबधमला : विष्णुशास्त्री चिपळूणकर
ज्ञानसिंधु : विरेश्वर छत्रे
दिनमित्र : मुकुंदराव पाटील
इंडिया : दादाभाई नौरोजी
प्रताप : गणेश शंकर विद्यार्थी
इंदूप्रकाश : विष्णुशास्त्री पंडित
बंगाली : एस एन बॅनर्जी
सुधारक : गो ग आगरकर
सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now
महत्वाचे शब्द : Bharatatil Vruttapatre Tyanche Sampadak,Newspapers History, इतिहासकाळातील वृत्तपत्रे , Old newspapers in India