Learn For Dreams
10 वी विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा Download 10th science subject notes
सूर्याचा अंतर्भागातील अनिशय तप्त असून तेथील तापमान सुमारे २×१०७ ०C इतके असते. अंतर्भागातील तापमानामुळे हायड्रोजन केंद्राकचे तेहे सतत हेलियम केंद्रात एकत्रीकरण होत असते. या प्रक्रियेला केन्द्रकिय सम्मीलन प्रक्रिया असे म्हणतात.
सूर्यापासून पृथ्वीला 1.8 × 1011 mw इतकी उर्जा मिळते
सौर कुकर सौर बंब, सौर शुष्कक, सौरपंप आणि सौर घट यांना और उर्जा उपकरणे असे म्हणतात.
भांडयाचा बाहयपृष्ठभाग काळ्या रंगाने रंगविला जातो. सौर कुकरच्या अंतर्भागात 1000 से. ते 1400 से इकडे तापमान वाढू शकते.
आधुनिक सौर घट सिलिकॉनपासून बनविलेले असतात.
नैसर्गिकरित्या आढळानार्यान युरेनियमची तीन समस्थनिके आहेत. 234U,235U, 238U यापैकी युरेनियम -238 हे ९९% पेक्षा जास्त प्रमाणात आढळते.
भारतामध्ये जलद प्रजनक क्रियाधानी (fast breeder reactor) कल्पक्कम येथे उभारली आहे.
सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी
केंद्रकीय एकत्रीकरण (Nuclear fusion) प्रक्रियेत दोन लहान केंद्रकाच्या एकत्रीकरणामुळे ऊर्जा निर्माण होते.
निसर्गात: समुद्राच्या पाण्यात ड्युटेरॉन सापडते. समुद्राच्या एक घनमीटर पाण्यातील सर्व ड्युटेरॉन एकत्र झाले तर 12 x 109 k. Joule एवढी ऊर्जा तयार होते.
जैविक रूपांतर प्रक्रियेत आंबवणे या प्रक्रियेचा समावेश होतो. याला किन्वन असेही म्हणतात.
प्रणीजन्य व वनस्पतीजन्य पदार्थाचे विनोक्सिश्वसन करणारे सूक्ष्मजीव पाण्याच्या सानिध्यात सहज विघटन घडवून आणतात व वायूंचे मिश्रण तयार होते. त्या वायूस जैवायू असे म्हणतात.
जैववायुमध्ये मिथेन, कार्बनडायॉक्साईड, हायड्रोजन, हायड्रोजन सल्फाईड यांचे मिश्रण असते.
जैववायुमध्ये मिथेनचे प्रमाण 80% असल्याने ते एक उत्तम इंधन असून धूर न करता जळते.
इथेनॉल, जैवडिझेल, जैवायू यांचा जैव इंधनामध्ये समावेश होतो.
बायोडिझेल सोयाबीन व मका यांच्या बियांपासून बनविले जाते. भारतामध्ये जाथ्रोफा (वन एरंड). करंजा व नागचंपा या वनस्पतींच्या बियांपासून मिळविलेल्या तेलाचा बायोडिझेल निर्मितीसाठी उपयोग होतो.
कोळसा, पेट्रोलियम नैसर्गिक वायू हि जीवाश्म इंधनाची उदाहरणे आहेत.
नैसर्गिक वायूंमध्ये मुख्यत: मिथेन वायू आढळतो.
लाकडामध्ये सेल्युलोज (C6H10O5)n हा मुख्य घटक आहे.
कार्बन उपलब्धतेच्या चढत्या श्रेणीनुसार पीट, लीग्राईट, बीट्यूमिनस, अॅन्थ्रेसाईट हे कोळशाचे चार मुख्य प्रकार आहेत.
गॅसोलीन, केरोसीन, डिझेल, फ्यूएल ऑइल इ. द्रव इंधनाचे प्रमुख प्रकार आहेत.
कृत्रिम वायु इंधनामध्ये कोल गॅस, ऑइल गॅस, पेट्रोल गॅस, वॉटर गॅस आणि प्रोड्यूसर गॅस यांचा समावेश होतो.
प्रोड्यूसर गॅस कार्बनमोनक्साईड (३०%) नायट्रोजन (६०%) व अन्य वायू (१०%) यांचे मिश्रण असते.
इंधनाचे कॅलरीमूल्य व प्रज्वलनांक हे दोन वैशिष्टपूर्ण गुणधर्म आहेत.
हायड्रोजनचे कॅलरीमूल्य सर्वात जास्त आहे. हायड्रोकार्बनपैकी मिथेनचे कॅलरीमूल्य सर्वात जास्त आहे.
लाकूड हे कार्बोहायड्रेटचे जटिल संयुग आहे.
एल.पी.जी. मध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे दोन्ही द्रवरूप स्वरुपात असतात.
कार्य करण्यासाठी साठविलेली क्षमता म्हणजे ऊर्जा होय.
एखादी वस्तु तिच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा संरूपणामुळे कार्य करू शकते, तेव्हा तिच्यामध्ये स्थितीज ऊर्जा आहे असे म्हंटले जाते.
गुरुत्व स्थितीज ऊर्जा आणि प्रत्यास्थी स्थितीज ऊर्जा ही यांत्रिक ऊर्जेची दोन रुपे आहत.
एखाधा चल वस्तूला तिच्या गतीमुळे प्राप्त होणारी ऊर्जा म्हणजेच गतीज ऊर्जा होय.
ही गतीज ऊर्जा KE = ½ mv2 या सूत्राणे दर्शवितात.
SI पद्धतीत ऊर्जेचे एकक न्यूटन मिटर आहे. याला ज्युल असे म्हटले जाते.
CGS पद्धतीत डाईन सेमी म्हणजेच अर्ग हे एकक वापरतात.
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now