5 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 5 जुलै 2021 चालू घडामोडी पीडीएफ डाऊनलोड करा.
5 जुलै 2021 चालू घडामोडी
दिनविशेष
- १६८७: सर आयझॅक न्यूटन यांनी फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.
- १८११: व्हेनेझुएलाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.
- १८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.
- १८४१: थॉमस कुक यांनी लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली.
- १८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.
- १९०५: लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
- १९१३: बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
- १९४६: फ्रान्स फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनीची विक्री सुरु.
- १९५०: इस्रायलच्या क्वेन्सेटने जगातील ज्यू व्यक्तीला इस्रायलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
- १९५४: आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.
- १९५४: बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले.
- १९६२: अल्जीरीयाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले
- १९७५: देवी या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.
- *१९७५: केप व्हर्डेला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.
- १९७५: विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर अॅश हे पहिले कृष्णवर्णीय खेळाडू बनले.
- १९७७: पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव. झुल्फिकार अली भुत्तो तुरुंगात.
- १९८०: स्वीडन टेनिसपटू ब्योर्न बोरग यांनी विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा सलग पाच वेळा जिंकली.
- १९९६: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि एन. पंत यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.
- १९९७: स्वित्झर्लंडच्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.
- २००९: अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.
- २०१२: ३१० मीटर (१०२० फूट) उंचीसह लंडनमधील द शर्ड ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.
५ जूलै – जन्म
- १८८२: हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२७)
- १९१८: केंद्रीय उद्योगमंत्री आणि केरळचे मुख्यमंत्री के. करुणारन यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)
- १९२०: साहित्यिक आनंद साधले यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९९६)
- १९२५: केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे राज्यपाल नवल किशोर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर २०१२)
- १९४६: केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार रामविलास पासवान यांचा जन्म.
- १९५२: चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २००० – मुंबई)
- १९५४: न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक जॉन राइट यांचा जन्म.
- १९६८: युट्युब चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वॉजिकी यांचा जन्म.
५ जुलै – मृत्यू
- १८२६: सिंगापूरचे संस्थापक सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १७८१)
- १८३३: जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निकेफोरे निओपे यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १७६५)
- १९४५: ऑस्ट्रेलियाचे १४ वे पंतप्रधान जॉन कर्टिन यांचे निधन.
- १९५७: भारतीय वकील आणि राजकारणी अनुग्रह नारायण सिन्हा यांचे निधन. (जन्म: १८ जून १८८७)
- १९९६: रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर यांचे निधन.
- २००५: लेगस्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट१९३४)
- २००६: भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२४)