24 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी PDF Download

24 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 24 August 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.

24 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी: 24 ऑगस्ट 2021

येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता 24 ऑगस्ट 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात. 

राष्ट्रीय बातम्या (Daily Current Affairs for Maharashtra state exams)

 1. आयआयटी मद्रासने भारतातील पहिली स्वदेशी मोटर-आधारित व्हीलचेअर ‘निओबोल्ट’ विकसित केली

आयआयटी मद्रासने ‘निओबोल्ट’ विकसित केले

आयआयटी मद्रासने ‘निओबोल्ट’ नावाचे भारतातील पहिले स्वदेशी मोटरवर चालणारी व्हीलचेअर वाहन विकसित केले आहे, जे केवळ रस्त्यांवरच नव्हे तर असमान भूभागावर देखील वापरले जाऊ शकते. त्याचा कमाल वेग 25 किमी प्रतितास आहे. याचा वापर दिव्यांग व्यक्तींना सहजपणे वावर करण्यासाठी होणार आहे.

 2. युक्तधारा पोर्टल

  • केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांनी सुदूर संवेदन आणि जीआयएस-आधारित माहितीचा वापर करून नवीन मनरेगा मालमत्तेचे नियोजन सक्षम करण्यासाठी “युक्तधारा” नावाचे भुवन अंतर्गत नवीन भू-स्थानिक नियोजन पोर्टल सुरू केले.
  • इस्रो आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने हे पोर्टल संयुक्तपणे विकसित केले आहे.
  • युक्तधारा क्षेत्रीय छायाचित्रांसह मनरेगा, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, पर ड्रॉप मोअर क्रॉप आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना इत्यादी विविध राष्ट्रीय ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत तयार केलेल्या मालमत्तेचे (जिओटॅग) भांडार म्हणून काम करेल.
  • युक्तधारा पोर्टल योजनेची गुणवत्ता सुनिश्चित करेल, प्रासंगिकतेसाठी तयार केलेल्या मालमत्तेचे दीर्घकालीन निरीक्षण सक्षम करेल, स्त्रोत वाटपासाठी नवीन कामांची ओळख सुलभ करेल.

आंतरराष्ट्रीय बातम्य (Current Affairs for mpsc daily)

 3. जगातील पहिले जीवाश्म मुक्त स्टील

जगातील पहिले जीवाश्म मुक्त स्टील
  • स्वीडन मधील हरित स्टील उत्पादक HYBRIT (हायब्रीट), ने कोळशाचा वापर न करता जगातील पहिले जीवाश्म मुक्त स्टीलचे ग्राहक वितरण केले आहे.
  • हे स्टील हायड्रोजन ब्रेकथ्रू आयर्नमेकिंग टेक्नॉलॉजी वापरून बनवले गेले आहे, जे कोळसा आणि कोकऐवजी 100% जीवाश्म-मुक्त हायड्रोजन वापरते.
  • हायब्रीट हा प्रकल्प व्हॅटनफॉल आणि एलकेएबी दोन्ही स्वीडिश राज्याच्या मालकीच्या कंपन्यांचा संयुक्त प्रकल्प आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • स्वीडनची राजधानी: स्टॉकहोम
  • स्वीडनचे अधिकृत चलन: क्रोन
  • स्वीडनचे पंतप्रधान: स्टीफन लोफवेन

अर्थव्यवस्था बातम्या (Current Affairs in Marathi for MPSC)

 4. राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन

  • केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय मंत्रालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालमत्ता मुद्रीकरण करण्यासाठी ‘राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन’ योजना सुरु केली.
  • मालमत्ता मुद्रीकरण, म्हणजे एखाद्या सरकार किंवा सार्वजनिक प्राधिकरणाच्या मालकीच्या मालमत्तेचा मर्यादित कालावधीचा परवाना/ भाडेपट्टी, खाजगी क्षेत्रातील संस्थेला ठराविक काळासाठी देणे.
  • केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 अंतर्गत मालमत्ता मुद्रीकरण अंतर्गत, नीती आयोगाने पायाभूत सुविधा मंत्रालयांशी सल्लामसलत करून पाइपलाइन विकसित केली आहे.
  • एनएमपीने केंद्र सरकारच्या मुख्य मालमत्तेद्वारे चार वर्षांच्या कालावधीत, आर्थिक वर्ष 2022 ते आर्थिक वर्ष 2025 पर्यंत 6.0 लाख कोटी रुपयांच्या एकूण कमाईची क्षमता, अंदाजित केली आहे.
  • आघाडीची  5 क्षेत्रे एकूण पाइपलाइन मूल्याच्या सुमारे 83% भाग घेतात. यामध्ये रस्ते (27%), त्यानंतर रेल्वे (25%), वीज (15%), तेल आणि वायू पाइपलाइन (8%) आणि दूरसंचार (6%) यांचा समावेश आहे.

करार बातम्या (daily Current Affairs for mpsc)

 5. पेटीएम आणि एचडीएफसी बँके मध्ये करार 

  • एचडीएफसी बँक आणि पेटीएमने पेमेंट गेटवे, पॉईंट ऑफ सेल मशीन्स आणि क्रेडिट उत्पादने सर्वसमावेशक उपाय तयार करण्यासाठी भागीदारी केली आहे.
  • यामध्ये पेटीएम पोस्टपेड समाविष्ट आहे जे बाय नाऊ पे लेटर (बीएनपीएल) सोल्यूशन, ईजी ईएमआय आणि फ्लेक्सी पे आहे.
  • भागीदारी मुळे वर्धित स्मार्टहब सोल्यूशन्स वापरात येईल. एचडीएफसी बँक स्मार्टहब सोल्यूशन्स हे एक एकीकृत प्लॅटफॉर्म आहे जे व्यापाऱ्यांना त्यांच्या सर्व व्यवसायाच्या गरजा भरण्यासाठी एक-स्टॉप सोल्यूशन शॉप ऑफर करते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • एचडीएफसी बँकेचे मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
  • *एचडीएफसी बँकेचे एमडी आणि सीईओ: शशिधर जगदीशन
  • एचडीएफसी बँकेची टॅगलाईन: आम्हाला तुमचे जग समजते
  • पेटीएम मुख्यालय: नोएडा, उत्तर प्रदेश
  • पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: विजय शेखर शर्मा
  • पेटीएमची स्थापना: 2009.

 6. अमृत महोत्सव श्री शक्ती चॅलेंज 2021

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत मायगोव्ह आणि युएन वुमेन यांनी अमृत महोत्सव श्री शक्ती इनोव्हेशन चॅलेंज 2021 सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे.
  • या आव्हानाचा हेतू महिलांच्या सुरक्षा आणि सक्षमीकरणाशी संबंधित महिला उद्योजकांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञान उपायांना प्रोत्साहित करणे आहे.
  • या उपक्रमामुळे नारी सशक्तिकरणला प्रोत्साहन मिळेल आणि महिलांना त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यास मदत होईल.
  • अमृत महोत्सव श्री शक्ती चॅलेंज 2021 बहु-भागीदार ट्रस्ट फंड (कोविड -19) कार्यक्रमांतर्गत राबविला जात आहे.

 7. भारत, एडीबी बेंगळुरूमध्ये मेट्रो रेल्वे नेटवर्कचा विस्तार करणार

  • आशियाई विकास बँक (एडीबी) आणि भारत सरकारने 56 किमी लांबीच्या दोन नवीन उन्नत मेट्रो लाइनच्या बांधकामासह बेंगळुरूमध्ये मेट्रो रेल्वे जाळे वाढवण्यासाठी $ 500 दशलक्ष कर्जावर स्वाक्षरी केली आहे.
  • या प्रकल्पात आऊटर रिंगरोड आणि राष्ट्रीय महामार्ग 44 सह सेंट्रल सिल्क बोर्ड आणि केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ 30 स्थानकांसह दोन मेट्रो तयार करणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • एडीबीचे अध्यक्ष: मासात्सुगु असाकावा
  • मुख्यालय: मनिला, फिलिपिन्स

बैठका व परिषद बातम्या (Current Affairs for mpsc)

 8. शाश्वत विकास प्रभाव शिखर परिषद 2021

  • जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक शाश्वत विकास प्रभाव शिखर परिषद 20-23 सप्टेंबर 2021 रोजी जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आयोजित करण्यात येईल.
  • या वर्षीचा कार्यक्रम अर्थव्यवस्थांचे सर्वसमावेशक पुनरुज्जीवन करण्यावर भर देणे हा आहे. संयुक्त राष्ट्र महासभा आयोजित या शिखर परिषदेची संकल्पना “एक समान, सर्वसमावेशक आणि शाश्वत पुनर्प्राप्ती (शेपिंग अन इक्विटेबल, इंक्लुसिव्ह अँड सस्टेनेबल रिकव्हरी)” ही आहे.
  • या शिखर परिषदेत खालील 4 क्षेत्रांवर भर दिला जाईल;
  1. अर्थव्यवस्थांचे पुनरुज्जीवन
  2.  प्रगत  सर्वसमावेशक पुनर्प्राप्ती
  3. हवामान कृती वृद्धिंगत करणे
  4. भविष्यातील अन्न व्यवस्थेला आकार देणे

महत्त्वाचे दिवस (Daily Current Affairs for MPSC)

 9. 23-27 ऑगस्ट: जागतिक जल सप्ताह 2021

  • जागतिक जल सप्ताह हा एक वार्षिक कार्यक्रम आहे जो स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूटतर्फे (एसआयडब्ल्यूआयच) 1991 पासून जागतिक जल समस्या आणि आंतरराष्ट्रीय विकासाशी संबंधित चिंता दूर करण्यासाठी आयोजित केला जातो.
  • 23-27 ऑगस्ट दरम्यान जागतिक जल सप्ताह 2021 चे आयोजन पूर्णपणे डिजिटल स्वरूपात करण्यात आले आहे.
  • जागतिक जल सप्ताह 2021 ची संकल्पना ‘बिल्डिंग रेझिलियन्स फास्टर [जलद लवचिकता वाढविणे]’ ही आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • एसआयडब्ल्यूआयचे कार्यकारी संचालक: टॉर्गनी होल्मग्रेन
  • एसआयडब्ल्यूआयचे मुख्यालय: स्टॉकहोम, स्वीडन

नियुक्ती बातम्या (MPSC daily current affairs)

 10. मणिपूरचे राज्यपाल म्हणून ला गणेशन यांची नियुक्ती

  • तामिळनाडूतील भाजपचे ज्येष्ठ नेते ला. गणेशन यांची 23 ऑगस्ट 2021 पासून मणिपूरचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • 10 ऑगस्ट 2021 रोजी नजमा हेपतुल्ला यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्त होते या काळात सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • मणिपूरचे मुख्यमंत्री: एन.बीरेन सिंह

संरक्षण बातम्या (Daily Current Affairs in Marathi)

 11. झैर-अल-बहर: भारत-कतार संयुक्त नौदल युद्धसराव 

  • भारतीय नौदल आणि कतार अमिरी नौदल दल (क्युईएनएफ) यांच्यातील झैर-अल-बहर या संयुक्त नौदल सरावाची दुसरी आवृत्ती, 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान पर्शियन आखातात आयोजित करण्यात आली होती.
  • भारतीय नौदलाची स्टील्थ फ्रिगेट आयएनएस त्रिकंदने या सरावात भाग घेतला होता.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • कतार राजधानी: दोहा
  • चलन: कतारी रियाल
  • कतारचे पंतप्रधान: शेख खालिद बिन खलिफा बिन अब्देलाझीझ अल थानी

पुस्तके आणि लेखक बातम्या (daily Current Affairs for mpsc)

 12. रितू मेनन यांचे “अ‍ॅड्रेस बुक: अ पब्लिशिंग मेमॉईर इन द टाईम ऑफ कोव्हीड” पुस्तक प्रकाशित 

  • रितू मेनन यांचे “अ‍ॅड्रेस बुक: अ पब्लिशिंग मेमॉईर इन द टाईम ऑफ कोव्हीड” हे डायरी स्वरूपातील पुस्तक प्रकाशित झाले आहे.
  • मेनन यांनी 1983 साली काली फॉर वुमन या भारताच्या पहिल्या स्त्रीवादी प्रेसची सह-स्थापना केली होती,सध्या वुमन अनलिमिटेड या केएफडब्ल्यूच्या सहयोगी,संस्थेच्या संस्थापक-संचालक आहेत.

 13. बॅटलफिल्ड: विश्राम बेडेकर यांच्या रणांगण पुस्तकाचा अनुवाद 

  • विश्राम बेडेकर यांच्या रणांगण या मराठी पुस्त्काचा जेरी पिंटो यांनी इंग्रजीत बॅटलफिल्ड या नावाने अनुवाद केला आहे.
  • दुसर्‍या महायुद्धापूर्वी युरोपमधून पळून गेलेल्या भारतीय पुरुष आणि जर्मन-ज्यू स्त्री यांच्यातील जहाजावरील प्रेमकथा या पुस्तकात आहे.

 14. बोरिया मजुमदार आणि कुशन सरकार यांचे “मिशन डॉमीनेशन: अ‍ॅन अनफिनिश्ड क्वेस्ट” पुस्तक 

  • बोरिया मजुमदार आणि कुशन सरकार लिखित “मिशन डॉमीनेशन: अ‍ॅन अनफिनिश्ड क्वेस्ट” या नवीन पुस्तकाचे प्रकाशन सायमन अँड शुस्टर पब्लिशर इंडिया प्रा. लि. यांनी केले आहे.
  • या पुस्तकात रीषभ पंत, रोहित शर्मा, शुभमन गिल, आर. अश्विन, चेतेश्वर पुजारा यासारख्या अनेक भारतीय क्रिकेटपटूंच्या जीवनातील घटनांची लघुकथा आहे.

Importance of Daily Current Affairs in Marathi

Importance of Daily Current Affairs in Marathi: Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *