Learn For Dreams
11 मे 2020 चालू घडामोडी डाउनलोड करा 11 May 2020 Chalu Ghadamodi Download
यूपीएससी पूर्व परीक्षा अखेर लांबणीवर:-
कोव्हिड-१९ विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन वाढवल्यानंतर अखेर केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने ३० मे रोजी होणारी पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. परीक्षेची पुढील तारीख घोषित करण्यासाठी २० मे रोजी पुन्हा एकवार परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल असं आयोगाने जाहीर केलं आहे.
1 May Chalu Ghadamodi
राष्ट्रीय पशू जैवतंत्रज्ञान संस्थेनी ‘ईकोवसेन्स’ उपकरण विकसित केले
– हैदराबादच्या राष्ट्रीय पशू जैवतंत्रज्ञान संस्था (NIAB) येथील संशोधकांनी एक उपकरण विकसित केले, ज्याला त्यांनी ‘ईकोवसेन्स’ (eCovSens) हे नाव दिले आहे.
▪️ठळक बाबी – हे एक बायोसेन्सर (जैवसंवेदक) आहे, ज्यामुळे पशूच्या लाळेची तपासणी कोविड-19 रोगासाठी केली जाऊ शकते.
*हे उपकरण केवळ 20 मायक्रोलिटर एवढ्या प्रमाणात नमुन्याचा वापर 30 सेकंदात आपला अहवाल देते.
हे उपकरण ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानाच्या माध्यमाने संगणक किंवा दूरध्वनी संचाशी देखील जोडले जाऊ शकते आणि ज्यामुळे माहितीचा अभ्यास केला जाऊ शकतो.
हे उपकरण साधारण सेल बॅटरीवर चालवले जाऊ शकतो कारण त्यात 1.3V-3V व्होल्टेजचा वापर केला जातो.
नवी दिल्लीमध्ये संसदेच्या नव्या इमारतीला पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी
– पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीने संसद भावनाच्या शेजारी नवीन संसद भवनाची उभारणी करण्यास मंजूरी दिली आहे.
– हा प्रकल्प राष्ट्रपती भवनापासून ते इंडिया गेट पर्यंत 3 किलोमीटर लांबीच्या सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास योजनेचा एक भाग आहे. हा प्रकल्प 15 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. बांधकाम प्रकल्पाला येणारा खर्च 922 कोटी रुपये एवढा आहे
. – भारतीय संसदेच्या नवीन इमारतीची खास वैशिष्ट्ये
– इमारत 10.5 एकर भूखंडावर 65,000 चौरस मीटर क्षेत्रफळात बांधण्यात येणार. इमारतीची उंची 42 मीटर असणार. – नव्या इमारतीचा आकार त्रिकोणी असणार आहे.
या इमारतीला तीन मोठे मिनार असणार आहेत. हे तीन मिनार लोकशाहीच्या तीन स्तंभांचे प्रतिक असतील.
– इमारतीमध्ये 900 ते एक हजार लोकप्रतिनिधींची आसनक्षमता असणारी लोकसभा, राज्यसभा आणि सेंट्रल हॉलप्रमाणे संयुक्त सभागृह असणार.
– इमारतीच्या तळाशी सर्व मंत्रालयाच्या कार्यालयांना जोडणारी शटल सेवाही असणार आहे.
– संसदेची नवी इमारत ही सध्याच्या संसदेच्या जवळच असणार. संसद भवनाच्या खिडक्या या भारतातली विविधता दर्शवतील.
– इमारतीमध्ये सर्व खासदारांची कार्यालयेही असणार. नवीन संसद भवन हे अत्याधुनिक असणार.
– संसदेचे 75 वे अधिवेशन नवीन इमारतीमध्ये आयोजित करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे.
– पंतप्रधानांसाठी नवीन निवासस्थान बांधण्याचीही योजना आहे. पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थान दिल्लीच्या महत्वाच्या परिसरात म्हणजेच सेंट्रल व्हिस्टा येथे असणार.
– सध्याचे संसद भवन ही भारतीय संसदेची इमारत आहे. 1912-13 यावर्षी ब्रिटीश वास्तुकार हर्बट ब्रेकर यांनी या वर्तुळाकार इमारतीची रचना केली.
– इमारतीच्या बाह्य वर्तुळकार गच्छीस 257 ग्रेनाइट स्तंभांचा आधार आहे.
संसद भवन दिल्लीला जनपथ वरील राष्ट्रपती भवन जवळ आहे
वंदे भारत मिशन’: परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारताची मोहीम
‘- कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या सर्वात मोठ्या मोहिमेला 7 मे 2020 पासून सुरुवात झाली. ‘वंदे भारत मिशन’ असे या अभियानाचे नाव आहे.
– या अभियानाच्या पार्श्वभूमीवर तिरुवनंतरपुरम, दिल्ली आणि मुंबईसह अनेक विमानतळांवर आरोग्यासंबंधी सर्व व्यवस्था केली गेली आहे.
ज्या प्रवाशांमध्ये कोविड-19 रोगाची कुठलीही लक्षणे आढळलेली नाहीत, त्यांनाच भारतात परत आणले जाणार आहे.
▪️इतर ठळक बाबी
– एअर इंडिया या सरकारी हवाई सेवा कंपनीची विमाने आणि जहाजातून जवळपास 15 हजार भारतीयांना टप्प्याटप्प्याने मायदेशी आणले जाणार आहे.
लोकांच्या वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी विमानतळे आणि बंदरे पूर्णत: सज्ज करण्यात आली आहेत.
– एकूण 64 विमानांपैकी 10 विमाने संयुक्त अरब अमिरातीकडे (UAE), 2 कतारकडे, 5 सौदी अरबकडे, 7 ब्रिटनकडे, 5 सिंगापूरकडे, 7 अमेरिकेकडे, 5 फिलिपीन्सकडे, 7 बांग्लादेशकडे, 2 बहारीनकडे, 7 मलेशियाकडे, 5 कुवैतकडे आणि 4 विमाने ओमानकडे उड्डाण करणार आहेत.
– एअर इंडिया 12 देशांमधून सुमारे 15000 भारतीयांना टप्प्याटप्प्याने परत आणणार आहे. पहिल्या टप्प्यात 13 मे पर्यंत 64 उड्डाण आयोजित केली जाणार.
13 मे 2020 नंतर खासगी विमान कंपन्याही भारतीयांना परत आणण्याच्या मोहीमेत सामील होऊ शकतात.
– भारतीय नौदलाची INS जलश्व आणि INS मगर ही जहाजे मालदीवहून भारतीयांना परत आणणार तर INS शार्दुल हे जहाज दुबईकडे वळविण्यात आले आहे.
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now