11 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

11 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 11 जुलै 2021 चालू घडामोडी पीडीएफ डाऊनलोड करा.

11 जुलै 2021 चालू घडामोडी

11 जुलै 2021 चालू घडामोडी

दिनविशेष

  • राष्ट्रीय मत्स्य उत्पादक दिवस – 10 जुलै.
  • जागतिक लोकसंख्या दिवस – 11 जुलै.

आंतरराष्ट्रीय

  • व्हिएतनाम देशाचे नवीन पंतप्रधान – फाम मिन्ह चिन.
  • 9 जुलै रोजी, खादी व ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) ____ या तीन देशांमध्ये “खादी” ब्रँडसाठी ट्रेडमार्क म्हणजेच व्यापारचिन्ह नोंदणी निश्चित केली आहे – भूतान, संयुक्त अरब अमिराती आणि मेक्सिको (इतर 6 देश: जर्मनी, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, रशिया, चीन आणि युरोपीय संघ).
  • 9 जुलै 2021 रोजी _ देशाने ‘कर धोरण आणि हवामान बदल’ विषयक जी-20 देशांसाठी उच्च-स्तरीय कर परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला – इटली.
  • आर्क्टिक सर्कल असेंब्ली 14 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2021 या काळात _ येथे वार्षिक कार्यक्रम आयोजित करणार आहे – रिक्जेविक, आइसलँड.
  • शांघाय सहकार्य संघटना (SCO) देशांच्या प्रमुखांची शिखर बैठक 16 सप्टेंबर आणि 17 सप्टेंबर रोजी ____ येथे होणार आहे – दुशान्बे, ताजिकिस्तान.

राष्ट्रीय

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO), न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) आणि अंतरिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय उद्योग महासंघ (CII) _ या संकल्पनेखाली 13 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आभासी आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषद आणि प्रदर्शनी आयोजित करणार आहे – ‘बिल्डिंग न्यूस्पेस इन इंडिया’.
  • भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) ____ विद्यापीठात ‘बंगाबंधू चेयर’ स्थापन करणार आहे – दिल्ली विद्यापीठ.

व्यक्ती विशेष

  • नवीन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री – महेंद्र नाथ पांडे.
  • इंटरनॅशनल एर्गोनोमिक्स असोसिएशन या संस्थेने मानवी घटक आणि एर्गोनोमिक्स या विषयांवरील संशोधनासाठी _ यांना ‘2021 IEA/ किंगफार पुरस्कार’ने सन्मानित केले – विभा भाटिया (भारत).

क्रिडा

  • नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) याचे संयुक्त सरचिटणीस यांची 2020 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांसाठी पहिले-वहिले भारतीय पंच म्हणून निवड झाली – पवन सिंग.

राज्य विशेष

  • ‘21 वा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी / उत्पादक दिवस 2021’ __ राज्यात साजरा झाला – मणिपूर.
  • 10 जुलै 2021 रोजी, _ राज्य कायदा आयोगाने प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचा पहिला मसुदा जाहीर केला, ज्यात दोन पेक्षा जास्त मुले असणार्‍या लोकांना सरकारी योजनांचा लाभ न देण्याची तरतूद आहे – उत्तर प्रदेश.
  • मध्य प्रदेश सरकारने आपत्ती व्यवस्थापन व राज्यातील कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी ____ येथे ‘स्थिती कक्ष’ (situation room) तयार केला – भोपाळ.
  • राजस्थान सरकारने _ येथे राज्यातील प्रथम आदिवासी मुलांची हॉकी प्रबोधिनी स्थापन करण्याची घोषणा केली – उदयपूर.

ज्ञान-विज्ञान

  • भुवनेश्वरच्या डीबीटी-इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेस या संस्थेचे शास्त्रज्ञ आणि एसआरएम-डीबीटी पार्टनरशिप प्लॅटफॉर्म फॉर अॅडव्हान्स लाइफ सायन्सेस टेक्नोलॉजीज, एसआरएम इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (तमिळनाडू) यांनी संयुक्तपणे केलेल्या एका अध्ययनात, पहिल्यांदाच, ‘_____’ या खारफुटीच्या मीठ प्रसवणाऱ्या जातीच्या संपूर्ण संदर्भ-श्रेणीतील जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजेच जनुकीय रचना उलगडण्यात यश मिळाले आहे – ‘अॅव्हीसिनिया मरीना’.
  • चीनी संशोधकांनी विकसित केलेला जगातील सर्वात शक्तिशाली क्वांटम संगणक – झुचोंगक्जी क्वांटम कॉम्प्युटर (66-क्युबीट यंत्र).

सामान्य ज्ञान

  • “नगरपालिका याची व्याख्या” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 243P (खंड 9अ).
  • “सहकारी संस्था याची व्याख्या” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 243ZH (खंड 9ब).
  • “अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्रांचे प्रशासन” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 244.
  • “आसाममधील काही आदिवासी विभागांचा समावेश असलेला एका स्वायत्त राज्याची निर्मिती तसेच स्थानिक विधिमंडळ किंवा मंत्रीपरिषद किंवा त्या दोन्हीची स्थापना” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 244अ.
  • “विशिष्ट न्यायालयांची स्थापना करण्याचा संसदेचा अधिकार” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 247.
  • “विधी तयार करण्याचा अवशिष्ट अधिकार” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 248.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *