18 मार्च 2022 चालू घडामोडी PDF Download

18 मार्च 2022 चालू घडामोडी PDF Download Now. 18 march 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.

29 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

18 मार्च 2022 चालू घडामोडी PDF Download

मुकेश अंबानी

18 मार्च 2022 चालू घडामोडी PDF Download

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची घोषणा :

  • पंजाबमध्ये 23 मार्चपासून भ्रष्टाचारविरोधात एक हेल्पलाईन सुरू केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरुवारी केली.
  • तर या हेल्पलाईनवर लाच मागणाऱ्या किंवा गैरव्यवहार करणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्यांची चित्रफीत अपलोड करता येईल.
  • तसेच राज्यात भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्यात येईल, असे ते म्हणाले.
  • दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मान यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 मार्च 2022)

शालेय अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश :

  • पुढील वर्षापासून गुजरातमधल्या शालेय विद्यार्थ्यांना शाळेत भगवद् गीतेचे धडे शिकायला मिळणार आहेत.
  • तर गुजरात सरकारने यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे.
  • गुजरात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे.
  • केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसारच हे बदल करण्यात आल्याची माहिती जितू वाघानी यांनी यावेळी दिली आहे.
  • 6वी ते 12वीपर्यंतच्या वर्गांमध्ये अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश करण्यात आल्याचं ते म्हणाले.

‘असनी’ठरणार 2022 मधलं पहिलं चक्रीवादळ :

  • असनी हे 2022 मधलं पहिलं चक्रीवादळ चारच दिवसात अंदमान निकोबारला धडकण्याची शक्यता आहे.
  • अंदमानला धडकल्यानंतर ते बांगलादेश आणि म्यानमारच्या दिशेने सरकेल.
  • बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र 21 मार्चपर्यंत चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे.
  • दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागावरील कमी दाबाचे क्षेत्र पूर्व-ईशान्य दिशेने सरकले आणि आज सकाळी 8.30 वाजता दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या पूर्व विषुववृत्तीय हिंदी महासागरावर मध्यभागी आले.
  • तसेच ते पूर्व-ईशान्य दिशेने पुढे सरकत राहण्याची शक्यता आहे.
  • तर येत्या शनिवारपर्यंत ते बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आणि अंदमान समुद्राच्या दक्षिणी भागात पसरण्याची शक्यता आहे.

जगातील सर्वात 10 श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी एकमेव भारतीय :

  • जगातील श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी स्थान मिळवलं आहे.
  • महत्वाचं म्हणजे Hurun Global Rich List 2022 मध्ये मुकेश अंबानी एकमेव भारतीय आहेत.
  • पण संपत्ती वाढण्याच्या बाबतीत बोलायचं गेल्यास गौतम अदानी यांना बाजी मारली आहे. त्यांच्या संपत्तीत दिवसाल कोट्यवधींची वाढ होत आहे.
  • हुरुनच्या यादीनुसार, मुकेश अंबानींची संपत्ती (Mukesh Ambani Net Worth) जवळपास 103 अरब डॉलर आहे.
  • तर गतवर्षीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 20 अरब डॉलर्सची वाढ झाली आहे.
  • यासोबतच जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या 10 जणांच्या यादीत ते नवव्या क्रमांकावर आहेत.
  • या यादीत गौतम अदानी यांचं नाव 12 व्या क्रमांवर असलं तरी गेल्या एका वर्षात त्यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे.
  • श्रीमंतांच्या यादीत (World Top-10 Richest Persons List) टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत.

आता वंदे भारत एस्क्प्रेस प्रतितास 200 किमीच्या वेगाने धावणार :

  • भारतीय रेल्वे विभाग मेड इन इंडिया या संकल्पेवर जास्त भर देत असून रेल्वे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
  • आता वंदे भारत रेल्वे प्रतितास 200 किमीच्या वेगाने धावणार असून त्यावर काम करण्यात येत आहे.
  • तसेच त्यांनी वंदे भारत रेल्वेची विशेषता तसेच त्याच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चाबाबत माहिती दिली.
  • तसेच त्यांनी प्रत्येक महिन्यात आठ वंदे भारत रेल्वे तयार केल्या जातील, असं सांगितलं.

31 मार्चपर्यंत आधार पॅन कार्ड लिंक न केल्यास काय होणार :

  • सरकारकडून आधार पॅन लिंक करण्याचा वारंवार सूचना देण्यात येत आहेत.
  • तर गेल्या काही वर्षांत पॅन लिंक करण्याची मुदत देखील वाढवण्यात आली होती.
  • आता आधारशी पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.
  • तर या तारखेपर्यंत दोन्ही कागदपत्रे लिंक न केल्यास अनेक परिणामांना सामोरे जावे लागेल.
  • सर्वप्रथम तुमचा पॅन निष्क्रिय होईल. एकदा का पॅन निष्क्रिय झाला की, तुम्ही कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत.
  • तसेच बँकेत खाते उघडणे, शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादींमध्ये गुंतवणूक करता येणार नाहीत.
  • तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर अधिक टीडीएस भरावा लागेल.
  • कर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एकदा का पॅन निष्क्रिय झाला, तर पॅन नंबर नाही असे गृहीत धरले जाईल.
  • तसेच आयकर कायद्यांतर्गत दंड भरण्यास जबाबदार धरलं जाईल.
  • 1961 कलम 272 (बी) नुसार पॅन सादर करू न शकल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाईल.

दिनविशेष:

  • शहाजी राजे भोसले यांचा जन्म 18 मार्च 1594 रोजी झाला होता.
  • 18 मार्च 1867 रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म झाला होता.
  • स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्म 18 मार्च 1881 रोजी झाला.
  • सन 1922 मध्ये महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल सहा वर्षे तुरूंगवास झाला.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन सन 1944 मध्ये भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *