Learn For Dreams
Confusion from health department student centers : आरोग्य विभागाच्या विद्यार्थ्यांच्या केंद्रांवरुन गोंधळ झाला.
ओळखपत्रांत परीक्षा ठिकाणांविषयी अपुरी माहिती; एकास चक्क उत्तर प्रदेशातील महाविद्यालयhttps://7ee0a348c7f5a529bcce2f1e0aa2b75a.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.html
देवेश गोंडाणे, लोकसत्ता
नागपूर : आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांसाठी शनिवार-रविवारी (२५ आणि २६ सप्टेंबर) लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांना मिळालेल्या परीक्षेच्या ओळखपत्राने गोंधळ उडवला आहे.
एका विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर चक्क उत्तर प्रदेश, नोएडाचे परीक्षा केंद्र नमूद आहे तर काहींच्या ओळखपत्रावर फक्त महाविद्यालयाचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांने कुठल्या जिल्ह्य़ाात परीक्षा द्यावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी या परीक्षेसंदर्भात आढावा बैठक घेऊन परीक्षा नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने होणार असल्याची ग्वाही दिली होती.
गोंधळ काय? सांगली येथील एका विद्यार्थ्यांने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या ओळखपत्रावर केवळ परीक्षा केंद्राच्या महाविद्यालयाचे नाव आहे. मात्र, गाव, जिल्हा काहीही दिलेले नाही. दुसऱ्या एका विद्यार्थ्यांला चक्क नोयडा, उत्तर प्रदेश येथील परीक्षा केंद्राचा पत्ता देण्यात आला आहे. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर लिंगबदल केला आहे. काही विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर वडिलांचे नावच नाही. काहींच्या नावाच्या ठिकाणी वडिलांचे नाव छापून आले आहे.