Learn For Dreams
मराठी व्याकरण शब्दांच्या शक्ती शब्दशक्ती उदाहरणे, अभिधा शब्दशक्ती प्रकार, शब्दशक्ती व्याख्या अर्थ.. मराठी व्याकरण शब्दांच्या शक्ती मराठी व्याकरणात श्ब्द्शक्ती तीन आहेत एक अभिधा,व्यंजना,लक्षणा Marathi Vyakaran Shabdanchya shakti मराठी व्याकरण शब्दांच्या शक्ती शब्दशक्ती उदाहरणे, अभिधा शब्दशक्ती प्रकार, शब्दशक्ती व्याख्या अर्थ
🌷 अभिधा शब्दशक्ती ( वाच्यार्थ ) Abhida Shabdshakti
अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला अभिधा असे म्हणतात. या अभिधा शक्तीच्या सहाय्याने प्रगट होणा-या अर्थास वाच्यार्थ असे म्हणतात.
अभिधा शब्दशक्ती उदाहरणार्थ
१) साप मारायला हवा.
२) मी एक लांडगा पाहिला.
३) आमच्याकडे एक अमेरिकन कुत्रा आहे.
४) बाबा जेवायला बसले.
५) घरात फार जळवा झाल्या आहेत.
६) आम्ही गहू खरेदी केला.
🌿 व्यंजना शब्दशक्ती (व्यंगार्थ) Vyanjana Shabdshakti 🌿
मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना असे म्हणतात. या शक्तीने प्रकट होणा-या अर्थाला व्यंगार्थ असे म्हणतात.
व्यंजना शब्दशक्ती उदाहरणार्थ
१) समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत.
२) भुंकणारे कुत्रे चावत नसतात.
३) निवडणुका आल्या कि कावळ्याची कावकाव सुरु होते.
४) समाजातील असल्या जळवा वेळीच नष्ट केल्या पाहिजेत.
५) घड्याळाने पाचचे ठोके दिले.
🌿 लक्षणा शब्दशक्ती (लक्षार्थ) Lakshana Shabdshakti 🌿
शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळेलसा दुसरा अर्थ घ्यावा लागतो, शब्दाच्या या शक्तीस लक्षणा शक्ती असे म्हणतात व या शक्तीमुळे प्रगट होणा-या अर्थास लक्षार्थे असे म्हणतात.
ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दांचा मूळ अर्थ लक्षात न घेता, त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो. मनात शंका येते, हे कसे शक्य आहे तेव्हा ती शब्द लक्षणा असते.
उदा.
आम्ही ज्वारी खातो.
याचा अर्थ आम्ही ज्वारीपासून केलेले पदार्थ खातो. शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याला साजेसा जो दुसरा अर्थ घेतला जातो त्याला ‘लक्ष्यार्थ’ म्हणतात.
लक्षणा शब्दशक्ती उदाहरणार्थ
1) बाबा ताटावर बसले.
2) घरावरून हत्ती गेला.
3) आम्ही आजकाल ज्वारी खातो.
4) मी शेक्सपिअर वाचला.
5) सूर्य बुडाला.
6) पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या.
🌷🌷 म्हणी 🌷🌷
म्हण म्हणजे विशिष्ट पद्धतीचे बोलणे. म्हणीच्या बाबतीत, एका पूर्ण विधानात बोलणाऱ्याच्या मनातील एक अनुभव व्यक्त झालेला असतो.
म्हणी हा आजपर्यंत होऊन गेलल्या लोकांच्या संचित ज्ञानाचा कोश आहे. परंपरेने लोकांच्या बोलण्यात आलेले नीतिपर, अनुभवसिद्ध वाक्यांच्या म्हणी तयार झालेल्या आहेत. वाक्प्रचार व म्हणीनी तयार झालेली भाषा सर्वांना आवडते.
सामान्यतः म्हणींच्या मागे कथेची पार्श्वभूमी असते. म्हणी त्याचा निष्कर्ष असतो.
🌷उदा.
काखेत कळसा गावाला वळसा.
अर्थ :- एका बाईचा विसरभोळेपणा दाखवला आहे. तिच्या कमरेवर कळशी असते; पण तिला त्याचा पत्ता नसतो. ती गावभर कळशी शोधत फिरत असते. जवळ असलेल्या वस्तूचा दूरवर शोध घेत राहणे हा अर्थ यातून व्यक्त होतो.
मराठी व्याकरण पुस्तकयादी
NO. | BOOK NAME | LINK | AUTHOR/PUBLICATION | MRP | OFFER |
01 | Deepstambh Marathi Vyakaran Prashnasanch 5100+ (Aayog + Sarav Prashnasanch) | Buy Now | By Deepstambh Publication | 340 | 289 |
02 | Unique Marathi Vyakaran | Buy Now | By Unique Publication | 180 | 100 |
03 | Sugam Marathi Vyakaran va Lekhan Prashnasangraha | Buy Now | By M.R. Walimbe | 239 | 130 |
04 | Paripurna Marathi Vyakaran – 3300+ Vastunishtha Prashnasanch ,12th | Buy Now | By Balasaheb Shinde | 300 | 164 |
05 | MPSC Fastrack Marathi Vyakaran | Buy Now | By Satish vase | 300 | 290 |
06 | Dnyandeep MPSC Vyakaran Prashnasanch Marathi + English 1984 te 2018 (Marathi) | Buy Now | By Dnyandeep Academy | 500 | 289 |
07 | MPSC MARATHI VA ENGRAJI GHATAKNIHAY PRASHNASANCH 1984-2020 | Buy Now | By Balasaheb Shinde | 460 | 315 |
08 | Paripurna Marathi Vyakaran 14th edition 2020 | Buy Now | By Balasaheb Shinde | 300 | 180 |
09 | सुगम मराठी व्याकरण | Buy Now | By M.R.Walimbe | 100 | 80 |
www.osdspo.com
shabd shakti Mhnaje kay, Shabd shakti Kashyala Mhnatat,shabd shakti che prakar,shabd shakti ke bhed,shabd shakti marathi, shabd shakti pdf, shabd shakti che udaharan, shabd shakti che kiti Prakar Ahet, shabd shakti ke kitne bhed hote hain, shabd shakti kitne prakar ki hoti hai naam likhiye, shabd shakti in hindi class 12,shabd shaktiyan, shabd shakti examples, shabd shakti Che Udaharane,
shabd shakti kise kahate hain,shabd shakti,shabd shakti ke prakar,shabd shakti ke bhed,shabd shakti marathi,shabd shakti pdf,shabd shakti ke udaharan,shabd shakti ke kitne bhed hai,shabd shakti ke kitne bhed hote hain,shabd shakti kitne prakar ki hoti hai naam likhiye,shabd shakti in hindi class 12,shabd shaktiyan,shabd shakti examples,shabd shakti ke example