मराठी व्याकरण वर्णमाला

मराठी व्याकरण वर्णमाला Marathi Vyakaran Varnmala

मराठी व्याकरण वर्णमाला Marathi Vyakaran Varnmala

वर्ण – आपल्या तोंडावाटे पडणार्‍या मूल ध्वनीला वर्ण असे म्हणतात.

·         मराठीत एकूण 48 वर्ण आहेत.

1. स्वर

2. स्वरादी

3. व्यंजन

1. स्वर : ज्यांचा उच्चार करतांना जिभेचा मुखातील कोठल्याही अवयवांशी स्पर्श होत नाही त्यांना स्वर असे म्हणतात.

अ, आ, इ, ई, ल्र, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ

स्वरांचे मुख्य प्रकार दोन आहेत.

अ, इ, ऋ, उ

2. दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.

·         आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ

स्वरांचे इतर प्रकार

1. सजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्‍या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.

  2. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.

अ-ई, उ-ए, ओ-ऋ

3. संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणार्‍या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.

  ए – अ+इ/ई

ऐ – आ+इ/ई

ओ – अ+उ/ऊ

औ – आ+उ/ऊ

2. स्वरादी : ज्याचा उच्चार करण्याअधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.

स्वर + आदी – स्वरादी

मुख्य दोन स्वरादी – अं, अः

स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.

नवे दोन स्वरदी : ओ, औ

हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.

उदा. बॅट, बॉल

3.व्यंजन : एकूण व्यंजन 34 आहेत.

ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.

·    

    व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.

1. स्पर्श व्यंजन (25)

2. अर्धस्वर व्यंजन (4)

3. उष्मा, घर्षक व्यंजन (3)

4. महाप्राण व्यंजन (1)

5. स्वतंत्र व्यंजन (1)

🌿1. स्पर्श व्यंजन : एकूण व्यंजन 25 आहेत.

ज्याचा उच्चार करतांना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडतांना टाळू, कंठ, मुर्धा, दात, व ओठ यांचा स्पर्श

करून बाहेर निघते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात.

उदा. क, ख, ग, घ, ड

च, छ, ज, झ, त्र

ट, ठ, ड, द, ण

त, थ, द, ध, न

प, फ, ब, भ, म

1. कठोर वर्ण – ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.

उदा. क, ख

च, छ

ट, ठ

त, थ

प, फ

2. मृद वर्ण – ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात.

उदा. ग, घ

ज, झ

ड, ढ

  द, ध

ब ,भ

  3. अनुनासिक वर्ण – ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.

उदा. ड, त्र, ण, न, म

सर्व मराठी व्याकरण नोट्स पहा किवा डाउनलोड करा

All Government Jobs Notification Visit Now For Free Online Mock Test Solve Now For Latest Govt Jobs Notification Visit Now Free Online Live Video Lectures Watch Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *