Learn For Dreams
म्हाडा भरती Non Creamy Layer : सदर सूचनेमुळे काही EWS उमेदवार यांनी आम्हाला सुद्धा NCL लागेल का या बद्दल विचारना केली आहे.
लक्षात घ्या EWS प्रवर्गातील उमेदवार यांचे EWS प्रमाणपत्र हेच त्याचे NCL असते. EWS साठी वेगळे NCL निघत नाही किंवा लागत नाही.
उपरोक्त नमूद परीक्षेकरिता अन्य मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक, वि.जा.(अ),भ.ज.(ब),भ.ज.(क),भ.ज.(ड) तसेच महिला आरक्षणांतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महिला आरक्षणांतर्गत खुल्या प्रवर्गातून अर्ज भरणाऱ्या महिला उमेदवारांकडे देखील नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आर्थिक वर्ष 2020-21 गृहीत धरून पुढील तीन वर्षांकरिता असलेले किंवा आर्थिक वर्ष 2020-21 पूर्वीचे परंतु 2021 पर्यंत ग्राह्य असणारे असावे. मार्च 2021 मध्ये पुढच्या प्रमाणपत्राची ग्राह्यता संपलेली आहे. अशा उमेदवारांना आर्थिक 2020-21 गृहीत धरले नवीन बनविलेले नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र सादर करावे लागेल.