6 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download

6 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 6 December 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.

6 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download

🌀🌀 दिनविशेष 🌀🌀

🌀 ६ डिसेंबर – घटना 🌀

  • १७६८: एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • १८७७: द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.
  • १८९७: परवाना टॅक्सीकॅब सुरु करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.
  • १९१७: फिनलँड रशियापासुन स्वतंत्र झाला.
  • १९७१: भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
  • १९७८: स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.
  • १९८१: डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली.
  • १९९२: अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.
  • १९९९: जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ऑलिम्पिक ऑर्डर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

🌀🌀 ६ डिसेंबर – जन्म 🌀🌀

  • १४२१: इंग्लंडचा राजा हेन्‍री (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: २१ मे १४७१)
  • १७३२: भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १८१८)
  • १८२३: जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर१९००)
  • १८५३: संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३१)
  • १८६१: कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९१९)
  • १९१६: गंधर्व भूषण जयराम शिलेदार यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९२)
  • १९१७: बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे २००८)
  • १९२३: लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर २००२)
  • १९३२: पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी २००७)
  • १९४५: अभितेने शेखर कपूर यांचा जन्म.
  • १९४८: भरतनाट्यम नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांचा जन्म.
  • १९८५: भारतीय क्रिकेटपटू आर. पी. सिंग यांचा जन्म.

🌀🌀 ६ डिसेंबर – निधन 🌀🌀

  • १८९२: सीमेन्स कंपनीचे संस्थापक वर्नेर व्होंन सीमेन्स यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८१६)
  • १९५६: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १८९१)
  • १९७१: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९०२)
  • १९७६: पत्री सरकार चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १९००)
  • १९९०: मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान तुक़ू अब्दुल रहमान यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९०३)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *