17 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

17 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 17 july 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा.

17 जुलै 2021 चालू घडामोडी

17 जुलै 2021 चालू घडामोडी

दिनविशेष

  • १८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.
  • १८१९: अ‍ॅडॅम्स-ओनिस करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.
  • १८४१: सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित.
  • १९१७: किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील.
  • १९४७: मुंबईते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी.
  • १९५५: वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे डिस्नेलँड सुरू केले.
  • १९७५: अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
  • १९७६: कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
  • १९९३: तेलुगू भाषेतील तेलुगू थल्ली हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान.
  • १९९४: विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.
  • २०००: अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना भरतनाट्य शिखरमणी पुरस्कार जाहीर.
  • २००४: तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले .

१७ जूलै – जन्म

  • १८८९: अमेरिकन लेखक अर्लस्टॅनले गार्डनर यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च१९७०)
  • १९१७: भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक बिजोन भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९७८)
  • १९१८: ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष कार्लोसमनुएल अराना ओसोरिया यांचा जन्म.
  • १९१९: संगीतकार स्नेहल भाटकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे २००७)
  • १९२३: कूपर कार कंपनी चे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर २०००)
  • १९३०: दलित साहित्यिक बाबूराव बागूल यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च२००८)
  • १९५४: जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मेर्केल यांचा जन्म.

१७ जुलै – मृत्यू

  • १७९०: स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अ‍ॅडम स्मिथ यांचे निधन. (जन्म: ५ जून १७२३)
  • १९९२: अभिनेत्री शांता हुबळीकर यांचे निधन.  (जन्म: १४ एप्रिल १९१४)
  • १९९२: बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९१६)
  • २००५: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर एडवर्ड हीथ यांचे निधन.
  • २०१२: समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे यांचे निधन. (जन्म: २४ जून १९२८)
  • २०१२: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५४.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *