12 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 12 जुलै 2021 चालू घडामोडी पीडीएफ डाऊनलोड करा.
12 जुलै 2021 चालू घडामोडी
दिनविशेष
- जागतिक मलाला दिवस – 12 जुलै.
आंतरराष्ट्रीय
- ‘सर्जनशील अर्थव्यवस्था’ या क्षेत्रात तरुणांना पुढाकार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याने ‘________’ नावाने एका आंतरराष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केली आहे, जो दर दोन वर्षात एकदा दिला जाणार – ‘UNESCO-बांगलादेश बांगाबंधु शेख मुजीबुर रहमान आंतरराष्ट्रीय पारितोषिक’.
राष्ट्रीय
- _ येथे शैवाक, नेचा आणि कवक या पुष्पहीन वनस्पतींच्या जवळपास 50 प्रजातींचा संग्रह असलेले भारतातील पहिले क्रिप्टोगॅमिक उद्यान तयार करण्यात आले – चकरात (देहरादून जिल्हा, उत्तराखंड).
- रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ____ येथे देशातील पहिल्या लिक्विफाइड नॅच्युरल गॅस (LNG) सुविधा प्रकल्पाचे उडघटण झाले – नागपूर, महाराष्ट्र.
- सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (STPI) या संस्थेने आरोग्य सेवा, IoT, ICT आणि ई-वाणिज्य क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या अभिनव स्टार्टअप उद्योगांसाठी येथे अटल इनक्युबेशन सेंटर (AIC) उभारले – बंगळुरू.
व्यक्ती विशेष
- वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन आणि वर्ल्ड लॉ असोसिएशन यांच्यावतीने देण्यात आलेल्या ‘रुथ बाडर जिन्सबर्ग मेडल ऑफ ऑनर’ या सन्मानाचे प्राप्तकर्ता – न्यायमूर्ती सुजाता मनोहर.
- __ ही अंतराळाचा प्रवास करणारी तिसरी भारतीय वंशाची महिला ठरली, जेव्हा तिने 11 जुलै 2021 रोजी व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीच्या पहिल्या मानवी उड्डाण चाचणीचा भाग म्हणून प्रवास केला – सिरीशा बांदला.
क्रिडा
- आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध दिवस या वर्षापासून 22 जुलै या दिवसाच्या जागी आता _ या दिवशी साजरा केला जाणार आहे – 27 ऑगस्ट.
- *‘2021 विम्बल्डन’ टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटाची विजेता – अॅशले बार्टी (ऑस्ट्रेलिया).
- ‘2021 विम्बल्डन’ टेनिस स्पर्धेत महिला दुहेरी गटाची विजेता जोडी – एलिस मर्टेन्स (बेल्जियम) आणि हसिह सु-वे (तैवान).
- ‘2021 विम्बल्डन’ टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी गटाची विजेता जोडी – निकोला मेक्टिक आणि माटे पावीक (क्रोएशियाची जोडी).
राज्य विशेष
- __ राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, राज्यामधील आदिवासी व इतर आदिवासींच्या समुदायांची संस्कृती आणि प्रथांच्या रक्षणासाठी ‘देशी विश्वास आणि संस्कृती विभाग’ नावाचा नवीन विभाग स्थापन केला जाईल – आसाम.
- _ राज्यातील ऑनलाइन शैक्षणिक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी “मुख्यमंत्री शिक्षण सशक्तीकरण निधी” या नावाने एक नवीन निधी स्थापित केला जात आहे – केरळ.
सामान्य ज्ञान
- “आंतरराष्ट्रीय कराराला लागू करण्याविषयीचा कायदा” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 253.
- “संसदेने बनविलेले कायदे आणि राज्यांच्या विधानमंडळांनी बनविलेले कायदे यांच्यातली विसंगती” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 254.
- “राज्ये आणि संघ यांची कर्तव्ये” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 256.
- “विशिष्ट प्रकरणांमध्ये राज्यांवर संघाचे नियंत्रण” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 257.
- “संघाकडे कार्ये सोपविण्याचा राज्यांचा अधिकार” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 258(अ).
- “भारताबाहेरच्या प्रांतांशी संबंधित संघाचे कार्यक्षेत्र” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 260.
- “सार्वजनिक कृत्ये, अभिलेख आणि न्यायालयीन कार्यवाही” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 261.