CET परीक्षेबाबत नवीन अपडेट : CET परीक्षेच्या नवीन तारीखा जाहीर.
CET परीक्षेबाबत नवीन अपडेट
अ. परीक्षेचे सर्वसाधारण स्वरूप :
- इयत्ता 11वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा / कानिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्या सर्व मंडळांच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण / प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येईल.
- सदर परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असेल.
- इयत्ता 11वी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा ही राज्यमंडळाच्या इ.10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
- सदर परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका / पेपर असेल व परीक्षेचा कालावधी दोन तासांचा राहील.
- सदर परीक्षेची प्रश्नपत्रिका आठ माध्यमांतून उपलब्ध असतील. विद्यार्थ्याने सदर परीक्षेच्या आवेदन पत्रात नोंदविलेल्या माध्यमानुसार त्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल.
- सेमी इंग्रजी या माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी आवेदनपत्रात निश्चित केलेल्या इंग्रजी व इतर माध्यमाचा विचार करून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येईल.
- सदर सामायिक प्रवेश परीक्षा ही ऑफलाइन स्वरूपाची असेल. यासाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असेल.
Official Website