राज्यात 74 हजारांहून अधिक शिक्षकांची आवश्यकता

The state needs more than 74000 teachers : युनेस्को अहवाल देशभरात 11 लाख शिक्षकांची गरज

The state needs more than 74000 teachers

The state needs more than 74000 teachers

देशभरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी अकरा लाख 16 हजारांहून अधिक शिक्षकांची आवश्यकता आहे. त्यात महाराष्ट्रात 74 हजारांहून अधिक शिक्षकांची गरज आहे. युनेस्कोच्या अहवालातून ही बाब समोर आली असून, त्यातून शाळांची गंभीर स्थिती उघड झाली आहे.

युनेस्कोच्या स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट फॉर इंडिया 2021:’नो क्लास, नो टीचर’ या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. शिक्षक अध्यापन शिक्षकांचे शिक्षण अशा विविध मुद्द्यांचा या अहवालात समावेश आहे.

उत्तर प्रदेशात सव्वातीन लाख शिक्षकांची कमतरता

देशात उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक तीन लाख 23 हजारहून अधिक शिक्षकांची आवश्यकता आहे. आसाम मध्ये दोन लाख 22 हजारहून अधिक, पश्चिम बंगाल मध्ये 84 हजार शिक्षकांची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *