Learn For Dreams
MPSC exam schedule 2022 : एमपीएससीने सोमवारी राज्यसेवा परीक्षा २०२१ ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, सहायक राज्य कर आयुक्त इत्यादी २९० पदे भरण्यात येणार आहेत. आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल.
MPSC exam schedule 2022: राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर
एमपीएससीने सोमवारी राज्यसेवा परीक्षा २०२१ ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, सहायक राज्य कर आयुक्त, गटविकास अधिकारी आणि तत्सम पदे, वित्त व लेखा सेवा सहायक संचालक, उद्योग उपसंचालक, सहायक कामगार आयुक्त, उपशिक्षणाधिकारी आणि तत्सम पदे, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी अशी २९० पदे भरण्यात येणार आहे. एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या संवर्गातील पदसंख्या आणि आरक्षणामध्ये सरकारच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.
‘ती’ मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अंतरिम आदेशाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीतर्फे ३० ऑक्टोबरला होणारी सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना आता आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुख्य परीक्षेची सुधारित तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती एमपीएससीकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.