27 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

27 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 27 july 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा.

27 जुलै 2021 चालू घडामोडी

27 जुलै 2021 चालू घडामोडी

दिनविशेष

 • १७६१: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४थे पेशवे बनले.
 • १८६६: आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. युरोप अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले.
 • १८९०: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.
 • १९२१: टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.
 • १९४०: अॅनिमेट शॉर्ट फिल्म ए जंगली हेअर मधून बग्स बनी हे पात्र प्रकाशित झाले.
 • १९४९: पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.
 • १९५५: दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.
 • १९८३: कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.
 • १९९७: द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे.
 • ९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.
 • २००१: सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.
 • २०१२: लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

२७ जूलै – जन्म

 • १६६७: स्विस गणितज्ञ योहान बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी१७४८)
 • १८९९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक यांचा जन्म.
 • १९११: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)
 • १९१५: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन यांचा जन्म.
 • १९५४: भारतीय वकील आणि राजकारणी जी.एस. बाली यांचा जन्म.
 • १९५५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अ‍ॅलन बॉर्डर यांचा जन्म.
 • १९६३: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू नवेद अंजुम यांचा जन्म.
 • १९६७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक राहुल बोस यांचा जन्म.
 • १९८३: भारतीय फुटबॉल खेळाडू सॉकर वेल्हो यांचा जन्म.

२७ जुलै – मृत्यू

 • १८४४: इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १७६६)
 • १८९५: किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादन उस्ताद बंदे अली खाँ बीनकार यांचे निधन.
 • १९७५: गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन.
 • १९८०: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१९)
 • १९९२: हिन्दी चित्रपट अभिनेते अमजद खान यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १९४० – गझनी, अफगाणिस्तान)
 • १९९७: हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वष्ट यांचे निधन.
 • २००२: भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)
 • २००७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९१७)
 • २०१५: भारताचे ११ वे राष्ट्रपती भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९३१)

One thought on “27 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

 • Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *