21 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

21 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 21 july 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा.

21 जुलै 2021 चालू घडामोडी

21 जुलै 2021 चालू घडामोडी

दिनविशेष

 • इ.स. पूर्व ३५६: जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.
 • १८३१: बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.
 • १९४४: २० जुलै १९४४ रोजी अ‍ॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी.
 • १९६०: सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.
 • १९७६: आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या.
 • १९८३: अंटार्क्टिका वरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सियस या पृथ्वीवरील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.
 • २००२: जगभर दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या वर्ल्ड कॉम या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.

२१ जूलै – जन्म

 • १८५३: ज्योतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १८९८)
 • १८९९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९६१)
 • १९१०: स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९९०)
 • १९११: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान उमाशंकर जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९८८)
 • १९२०: गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट २००२)
 • १९३०: भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचा जन्म.
 • १९३४: क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष चंदू बोर्डे यांचा जन्म.
 • १९४५: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू बॅरी रिचर्ड्स यांचा जन्म.
 • १९४७: सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य चेतन चौहान यांचा जन्म.
 • १९६०: पंजाबी गायक अमरसिंग चमकीला यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च१९८८)

२१ जुलै – मृत्यू

 • १९७२: भूतानचे राजे जिग्मेदोरजी वांगचूक यांचे निधन. (जन्म: २ मे १९२९)
 • १९९४: मराठी बखर वाङ्‌मयाचे अभ्यासक डॉ. र. वि. हेरवाडकर यांचे निधन.
 • १९९५: संगीतकार मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचे निधन.
 • १९९७: साहित्यिक राजा राजवाडे यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९३६)
 • १९९८: अमेरिकन अंतराळवीर ऍलन शेपर्ड यांचे निधन.
 • २००१: दाक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९२८)
 • २००२: मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे निधन.
 • २००९: किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगळ यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९१३)
 • २०१३: भारतीय मार्शल आर्टिस्ट लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९८१)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *