20 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

20 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 20 july 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा.

20 जुलै 2021 चालू घडामोडी

20 जुलै 2021 चालू घडामोडी

दिनविशेष

 • १४०२: तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.
 • १८०७: निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.
 • १८२८: मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
 • १८७१: ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.
 • १९०३: फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडी बाहेर पडली.
 • १९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली.
 • १९२६: मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
 • १९४४: दुसरे महायुद्ध – क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अ‍ॅडॉल्फ हिटलर बचावला.
 • १९४९: इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.
 • १९६०: सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी.
 • १९६९: नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला.
 • १९७३: केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.
 • १९७६: मंगळाव प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.
 • १९८९: म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले.
 • २०००: अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार जाहीर.
 • २०१५: पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.

२० जूलै – जन्म

 • ख्रिस्त पूर्व ३५६: मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून ख्रिस्त पूर्व ३२३)
 • १८२२: जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८४)
 • १८३६: ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९२५ – केंब्रिज, केंब्रिजशायर, इंग्लंड)
 • १८८९: बीबीसी चे सहसंस्थापक जॉन रीथ यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून१९७१)
 • १९११: भारतीय क्रिकेट खेळाडू बाका जिलानी यांचा जन्म.
 • १९१९: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी २००८)
 • १९२१: बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९९४)
 • १९२९: हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्रकुमार यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै१९९९)
 • १९७६: भारतीय क्रिकेट खेळाडू देबाशिष मोहंती यांचा जन्म.

२० जुलै – मृत्यू

 • १९२२: रशियन गणितज्ञ आंद्रे मार्कोव्ह यांचे निधन.
 • १९३७: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १८७४)
 • १९४३: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८८२)
 • १९५१: जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला) यांचे निधन.
 • १९६५: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर १९१०)
 • १९७२: अभिनेत्री गीता दत्त यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९३०)
 • १९७३: अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १९४०)
 • १९९५: शास्त्रीय गायक शंकरराव बोडस यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर१९३५)
 • २०१३: भारतीय राजकारणी खुर्शिद आलम खान यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१९) .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *