10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download Now.10 January 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

मयंक अग्रवाल

10 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (10 जानेवारी 2022)

चिनी यानाकडून चंद्रावरील पाण्याचा पुरावा :

  • चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी होते, याचा पहिला प्रत्यक्ष पुरावा चीनच्या चँग-5 यानास आढळला आहे.
  • तर यातून पृथ्वीचा हा उपग्रह शुष्क कसा बनला, हे समजून घेणे शक्य होणार आहे.
  • तसेच चीनचे हे चांद्रयान चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले, तेथील पृष्ठभागावरील मातीमध्ये 120 पीपीएमपेक्षा कमी पाणी आहे.
  • तर हे प्रमाण एक टन मातीमध्ये 120 ग्रॅम पाणी इतके आहे. त्याचप्रमाणे तेथील हलक्या सच्छिद्र खडकामध्ये 180 पीपीएमपेक्षा कमी पाणी दिसून आले आहे.
  • पृथ्वीच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांच्या तुलनेत चंद्राचा पृष्ठभाग फारच शुष्क आहे.
  • चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे अस्तित्व हे दूरवरून निरीक्षणातून निश्चित करण्यात आले असले तरी, या यानाने आता चांद्रभूमीवरील खडक आणि मातीमध्ये पाणी असल्याच्या खुणा शोधून काढल्या आहेत.
  • तसेच या यानावरील एका साधनाद्वारे पृष्ठभागावरील माती आणि खडकांची स्पेक्ट्रल रिफ्लेक्टन्स तपासणी करून त्याच वेळी पाण्याचे अस्तित्व शोधून काढले. हे प्रथमच घडले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 जानेवारी 2022)

‘नीट-पीजी’ प्रवेशप्रक्रिया बुधवारपासून :

  • वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया (नीट-पीजी) येत्या 12 जानेवारी सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी केली.
  • सन 2021-22 वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले होते.
  • तर या प्रवेशात इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांसाठी 27 टक्के, तर आर्थिक दुर्बल गटातील (ईडब्ल्यूएस) उमेदवारांसाठी 10 टक्के आरक्षणही कायम ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते.

10 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

भारताकडून पुरस्कारासाठी मयंक अग्रवालला नामांकन :

  • न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालला डिसेंबर महिन्यातील आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
  • तसेच मयंकशिवाय न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.
  • नियमित सलामीवीर रोहित शर्मा, शुबमन गिल आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत मयंकने न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.
  • तर या कालावधीत खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांमध्ये त्याने 69.00 च्या सरासरीने 276 धावा केल्या ज्यात 2 अर्धशतक आणि 1 शतकाचा समावेश आहे.

भारतातील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत ‘व्हीएआर’चा वापर :

  • भारतात होणाऱ्या महिलांच्या आगामी ‘एएफसी’ आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीपासून चित्रफीत साहाय्यक सामनाधिकारी (व्हीएआर) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
  • भारतातील फुटबॉल स्पर्धात ‘व्हीएआर’चा वापर होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
  • तर यंदा आशियाई चषक स्पर्धा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे रंगणार आहे.
  • नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम आणि पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी या दोन मैदानांवर सामनाधिकाऱ्यांना ‘व्हीएआर’ तंत्रज्ञान उपलब्ध असणार आहे.
  • आशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी) सामनाधिकाऱ्यांच्या निर्णयांचा उच्च स्तर राखण्यासाठी प्रयत्नशील असून स्टेडियम आणि संघांच्या सराव केद्रांवर ‘व्हीएआर’ची चाचणी करण्यात येणार आहे.

दिनविशेष :

  • 10 जानेवारी 1666 मध्ये सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.
  • पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास 10 जानेवारी 1730 मध्ये सुरुवात झाली.
  • 10 जानेवारी 1806 मध्ये केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.
  • 10 जानेवारी 1926 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
  • भारत व पाकिस्तान यांच्यात 10 जानेवारी 1966 मध्ये ताश्कंद करार झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *