राष्ट्रीय उत्पन्न

राष्ट्रीय उत्पन्न

admin

राष्ट्रीय उत्पन्न

उत्पन्नाचे प्रकार –

राष्ट्रीय उत्पनाच्या मोजमापाच्या दृष्टीने उत्पन्नाचे दोन प्रकार आहेत

१. घटक उत्पन्न – भूमी, श्रम, भांडवल व उद्योजगता हे चार उत्पन्नाचे घटक मानले जातात. उत्पादनाच्या घटकाच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाला ‘घटक उत्पन्न’ असे म्हणतात. उदाहरणार्थ- भूमी मालकाला खंड, कामगाराला मजुरी, भांडवल मालकाला व्याज, उद्योजाकाला नफा, इत्यादी.

२. गैर-घटक उत्पन्न – काही प्रकारचे उत्पन्न कोणत्याही प्रकारचे काम/त्याग न करता प्राप्त होते, त्यास ‘गैर-घटक उत्पन्न’ म्हणतात. याला ‘हस्तांतरित उत्पन्न’ असेही म्हणतात. उदाहरणार्थ- भेट, देणग्या, डोनेशन, धर्मादायिक देणग्या, कर, दंड, इत्यादी.

राष्ट्रीय उत्पन्न मोजताना फक्त घटक उत्पन्नच विचारात घेतले जाते.

काही महत्वाच्या व्याख्या –

 • भारताचे आर्थिक प्रक्षेत्र = भारताचे भौगोलिक क्षेत्र + भारताची परदेशातील दूतावास व संबंधित सरकारी कार्यालये – भारतातील सर्व परदेशी दूतावास व आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालये
 • मध्यमवर्ती वस्तू – एका उत्पादन संस्थेने दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेल्या सर्व वस्तूंना ‘मध्यमवर्ती वस्तू’ म्हटले जाते. उदाहरणार्थ- पीठ विक्री करणाऱ्या गिरणीने विकत घेतलेला गहू हा गीरानिसाठी मध्यमवर्ती वस्तू असेल.
 • अंतिम वस्तू – अशा सर्व वस्तू व सेवा ज्यांची खरेदी उपभोगासाठी किंवा गुंतवणुकीसाठी केली जाते, मात्र पुनर्विक्रीसाठी नाही त्यांना ‘अंतिम वस्तू’ म्हणतात. उदाहरणार्थ- यंत्रे, उपकरणे, वाहने
 • मूल्यवर्धित = प्रदान मूल्य – मध्यमवर्ती खर्च
 • स्थूल मूल्यवर्धित (Gross value added) = घसारा वजा न करता मोजलेले मूल्यवर्धित
 • निव्वळ मूल्यवर्धित (Net value added) = स्थूल मूल्यवर्धित – घसारा
 • बाजारभाव = खरेदीदार ज्या किंमतीला उत्पादन संस्थेकडून वस्तू किंवा सेवा विकत घेतात ती किंमत.
 • घटक किंमत = बाजारभाव – अप्रत्यक्ष कर + अनुदाने

देशांतर्गत उत्पाद –

१. स्थूल देशांतर्गत उत्पाद, बाजारभावाला मोजलेले (GDP at market price) = सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मुल्यवर्धीतांची बेरीज

२. निव्वळ देशांतर्गत उत्पाद, बाजारभावाला मोजलेले (NDP at market price) = स्थूल देशांतर्गत उत्पाद – घसारा

३. स्थूल देशांतर्गत उत्पाद, घटक किमतीला मोजलेले (GDP at factor cost) =स्थूल देशांतर्गत उत्पाद, बाजारभावाला मोजलेले – अप्रत्यक्ष कर + अनुदाने

४. निव्वळ देशांतर्गत उत्पाद, घटक किमतीला मोजलेले (NDP at factor cost) = निव्वळ देशांतर्गत उत्पाद, बाजारभावाला मोजलेले – अप्रत्यक्ष कर + अनुदाने

राष्ट्रीय उत्पाद –

 • स्थूल राष्ट्रीय उत्पाद = स्थूल देशांतर्गत उत्पाद + परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न
 • निव्वळ राष्ट्रीय उत्पाद = निव्वळ देशांतर्गत उत्पाद + परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न
 • राष्ट्रीय उत्पन्न = स्थूल देशांतर्गत उत्पाद, बाजारभावाला मोजलेले – घसारा – अप्रत्यक्ष कर + अनुदाने + परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न.
 • घटक किंमतींना मोजलेल्या निव्वळ राष्ट्रीय उत्पादालाच देशाचे वास्तव ‘राष्ट्रीय उत्पन्न’ म्हणून संबोधले जाते.

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती –

१. उत्पादन पद्धत/ मूल्यवर्धित पद्धत (Value Added Method/Production Method) – यात देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या मुल्यवर्धीतांची बेरीज केली जाते. हे राष्ट्रीय उत्पन्न बाजारभावाला मोजलेले असते.

२. उत्पन्न / आय पद्धत (Income method) – यात राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप उत्पादनाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाच्या आधारावर केली जाते. हे राष्ट्रीय उत्पन्न घटक किमतींना मोजलेले असते.

३. खर्च पद्धत (Expenditure method) – यात वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी केलेल्या खर्चाची (उपभोग व गुंतवणूक खर्च) बेरीज केली जाते. खर्च पद्धतीने स्थूल देशांतर्गत उत्पाद = खाजगी अंतिम उपभोग खर्च (C) + सरकारी अंतिम उपभोग खर्च (G) + स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मिती (I) + निव्वळ निर्यात (X-M)

अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *