Learn For Dreams
एड्स रोग लक्षणे उपचार माहिती AIDS Symptoms of AIDS Treatment Information AIDS
लोंगफोर्म –
AIDS- Aquired (प्राप्त), Immuno (प्रतिकारशक्ती), Dfficiency (अभाव), Syndrome (लक्षणसमुह)
व्याख्या – प्रतिकारशक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोगलाक्षणांच्या एकत्रित समूह म्हणजेच ‘एड्स’ होय.
एड्स हा H.I.V. विषाणूमुळे होणारा आजार आहे. (Human Immuno dfficiency Virus- मानवाची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू)
एड्सच्या H.I.V. विषणूचा शोध 1983 साली डॉ. ल्यूक मोण्टिग्रेयर (फ्रेंच) व डॉ. रॉबर्ट गॅलो (अमेरिकन) या शास्त्रज्ञांनी लावला
जगामध्ये 1981 साली अमेरिकेत एड्सचा पहिला रुग्ण आढळला.
भारतामध्ये 1883 साली मद्रासमध्ये पहिला H.I.V. पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.
भारतामध्ये मे 1986 साली मुंबई शहरात पहिला एड्सचा रुग्ण आढळला.
जगात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – भारत देशात
भारतात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – महाराष्ट्र राज्यात
महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुंग – सांगली जिल्ह्यात
महाराष्ट्रात शहरांपैकी सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – मुंबई शहरात
जागतिक एड्स दिन – 1 डिसेंबर
NARI (नारी) National AIDS Research Institute (भोसरी) पुणे.
NACO (नौको) National AIDS Control Organization दिल्ली.
MSACS – Maharashtra state AIDS Control Society (वडाळा) मुंबई.
H.I.V. बाधित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध.
H.I.V. बाधित व्यक्तीचे रक्त किंवा रक्तघटक निरोगी व्यक्तीस दिल्यास. (रक्त संक्रमण) एड्स बाधित रुग्णास वापरलेल्या सुया/सिरिंजेस निर्जतुक न करता परत वापरल्यास. H.I.V. बाधित गरोदर मातेपासून तिच्या होणार्या बाळाला (नाळेमार्फत) (H.I.V. बाधित व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने, चुंबन घेतल्याने, एकत्र बसण्याने, एकत्र जेवल्याने, एकत्र राहण्याने एड्स या रोगाचा प्रसार होत नाही.)
अकारण वजनात 10% पेक्षा जास्त घट होणे.
सतत बारीक ताप, रात्रीचा घाम येणे. (1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी)
सतत जुलाब होणे व कोणत्याही औषधाने ते बारे न होणे.
तोंडात, अन्ननलिकेत चट्टे उठणे.
3 महिन्यापेक्षा जास्त काळ राहणारी ‘लसिका ग्रंथाची’ (लिम्फ ग्लॅंड) सूज, गंभीर लक्षणे :- 1) नुमोनिया 2) मेंदूज्वर 3) हरपीस 4) विविध प्रकारचे कर्करोग 5) क्षयरोग
आधिशयन काळ – 5 ते 8 वर्षे/सर्वसाधारण: (कधी-कधी 8 ते 10 वर्षे)
इलायझा चाचणी (ELISA Test) H.I.V. संसर्गाचे प्राथमिक निदान होते. सर्वत्र उपलब्ध. गवाक्ष काळात (3 ते 5 महीने) निगेटिव्ह (नकारात्मक) येऊ शकते. म्हणून ही चाचणी परत 3 महिन्यांनी करावी लागते.
वेस्टर्न ब्लॉट (Westrn Blot) हमखास 100% खात्रीशीर चाचणी. इलायझा चाचणी होकारात्मक आल्यास H.I.V. संसर्गाची खात्री या चाचणीने करता येते.
पी.सी.आर. (P.C.R. Test) – जगात सर्वांची सुधारित / प्रगत चाचणी. डी.एन.ए. ची तपासणी करतात. लागण झाल्यास तिसर्यावच दिवशी निदान होऊ शकते.
मार्च 1985 – एलयाझा तपासणीची उपलब्धता.
जुलै 1987 – ‘झिडोव्ह्युडीन’ हे औषध एड्स उपचारासाठी उपलब्ध
झिडोव्ह्युडीन (Zidovudine), (नेव्हरॅपिन) ही सर्व औषधे फक्त विषाणूंची वाढ थोपवितात व रुग्णाचे आयुष्मान वाढवितात.
H.I.V. बाधित गर्भवतीकडून होणार्याु बाळाला H.I.V. च संसर्ग टाळण्यासाठी सध्या ग्रामीन रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार करण्यात येतो, त्यास ‘अॅंटी रिट्रोव्हायरला थेरपी’ असे म्हणतात. (Anti Retroviral Therapy Treatment)
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now