17 फेब्रुवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

17 फेब्रुवारी 2022 चालू घडामोडी PDF Download Now. 17 February 2022 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.

29 जानेवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

17 फेब्रुवारी 2022 चालू घडामोडी PDF Download

1) Parliament of India: Rajya Sabha: Study Material for MPSC Combine Exam 2022, भारताची संसद: राज्यसभा

भारताची संसद: राज्यसभा, या लेखात तुम्हाला राज्यसभेची भूमिका, रचना, कालावधी यासारखी राज्यसभेबद्दल तपशीलवार माहिती मिळेल. राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी पात्रता आणि राज्यसभेची काही विशेष शक्ती.

भारताची संसद: राज्यसभा
Categoryअभ्यास साहित्य
ExamMPSC Group B and Group C Exam
SubjectIndian Polity
NameParliament of India: Rajya Sabha

Parliament of India: Rajya Sabha

Parliament of India: Rajya Sabha: महाराष्ट्रात MPSC मार्फत MPSC Group B पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 ला होणार आहे सोबतच, MPSC Group C पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे. या दोन्ही परीक्षेत राज्यघटना हा महत्वाचा विषय आहे. कारण MPSC Group B आणि Group C च्या पूर्व परीक्षेत भारताची राज्यघटना या विषयावर सरासरी 12 ते 14 प्रश्न विचारल्या जातात. आपल्या अभ्यासाला मदत मिळावी म्हणून Adda247 मराठी एक लेखमालिका (Article Series) आपणासाठी दररोज घेऊन येत आहे राज्यघटनेचा अभ्यास करतांना सर्वात पहिले भातीय संसद (Parliament of India) अभ्यासावी लागते. भारतीय संसदेचे तीन प्रमुख अंग आहेत राष्ट्रपती (President), राज्यसभा (Parliament of India: Rajya Sabha) व लोकसभा (Parliament of India: Lok Sabha). या आधी आपण लोकसभेविषयी माहिती पहिली आहे. आज या लेखात आपण Parliament of India: Rajya Sabha (राज्यसभा) बद्दल संपूर्ण माहिती जसे की, राज्यसभेची भूमिका, राज्यसभेची रचना, राज्यसभेचे अधिकार व इतर महत्वाची माहिती पाहणार आहे.

Parliament of India: Rajya Sabha | भारताची संसद: राज्यसभा

Parliament of India: Rajya Sabha: भारतीय संघाच्या सर्वोच्च कायदेमंडळाला ‘संसद’ (Parliament) म्हणून संबोधले जाते. संसद ही भारतीय शासनव्यवस्थेचे कायदेकारी अंग (Legislative organ) आहे. घटनेच्या कलम 79 अन्वये, भारताच्या संघराज्यासाठी एक संसद असेल, आणि ती राष्ट्रपती (President) व लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभा (Rajya Sabha) ही दोन सभागृहे मिळून बनलेली आहे.

2) RBI Assistant 2022 Notification Out for 950 Posts | RBI सहाय्यक 2022 950 पदांसाठी अधिसूचना जाहीर

RBI असिस्टंट 2022: RBI असिस्टंट परीक्षा दर वर्षी भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विविध शाखांमध्ये सहाय्यकांच्या पदासाठी पात्र उमेदवारांची भरती करण्यासाठी RBI सहाय्यक परीक्षा घेतली जाते. या लेखात आपण RBI असिस्टंट नोटिफिकेशन 2022, RBI असिस्टंट नोटिफिकेशन 2022 च्या महत्त्वाच्या तारखांबद्दल संपूर्ण तपशील पाहू.

RBI Assistant 2022
OrganisationReserve Bank of India (RBI)
PostAssistants
Exam LevelNational
Vacancy950
Application ModeOnline
RBI Official Websiterbi.org.in

RBI Assistant 2022 Notification | RBI सहाय्यक 2022 अधिसूचना

RBI Assistant 2022 Notification Out: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी RBI Assistant (सहाय्यक) पदांसाठी 950 रिक्त पदांची घोषणा करणारी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. RBI Assistant 2022 साठी तपशीलवार अधिसूचना 17 फेब्रुवारी 2022 रोजी अधिकृत वेबसाइटवर 950 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे ज्यासाठी 17 फेब्रुवारी ते 08 मार्च 2022 पर्यंत ऑनलाइन नोंदणी सुरू असणार आहे. RBI Assistant ऑनलाइन परीक्षा 26 आणि 27 मार्च 2022 रोजी होणार आहे. निवड प्रक्रियेमध्ये प्राथमिक परीक्षा आणि त्यानंतर मुख्य परीक्षा आणि भाषा प्राविण्य चाचणी समाविष्ट असते.

RBI Assistant 2022- Important Dates | RBI सहाय्यक 2022- महत्त्वाच्या तारखा

भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे की RBI Assistant 2022 साठी ऑनलाइन नोंदणी 17 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होईल. RBI Assistant च्या महत्त्वाच्या तारखांसाठी दिलेल्या टेबलचा संदर्भ घ्या. RBI Assistant 2022 परीक्षेची तारीख आणि ऑनलाइन अर्जाची तारीख दिलेल्या तक्त्याद्वारे तपासा:

RBI Assistant 2022 – Important Dates
EventsDates
RBI Assistant Notification 2022 Release17th February 2022
RBI Assistant Apply Online Start Date17th February 2022
RBI Assistant Apply online Last Date08th March 2022
RBI Assistant Prelims Admit CardMarch 2022
RBI Assistant Prelims Exam Date26th & 27th March 2022
RBI Assistant Prelims ResultTo Be Notified Soon
RBI Assistant Mains Exam DateTo Be Notified Soon

RBI Assistant 2022 Notification | RBI सहाय्यक अधिसूचना 2022

RBI ने 17 फेब्रुवारी 2022 रोजी तपशीलवार जाहिरात किंवा RBI Assistant 2022 अधिसूचना pdf प्रकाशित केली आहे ज्यात RBI Assistant ऑनलाइन नोंदणी तारखा, परीक्षेच्या तारखा, रिक्त जागा, पात्रता आणि बरेच काही यासंबंधी सर्व तपशील नमूद केले आहेत. RBI Assistant Notification 2022 डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक येथे प्रदान केली आहे. RBI Assistant 2022 अधिसूचनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

3) Important Events of Indian Freedom Struggle: Study Material for MPSC Combine Exam 2022, भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाच्या घटना

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाच्या घडामोडी, या लेखात तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाच्या घटनांबद्दल तपशीलवार माहिती मिळेल, भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाच्या घटनांची सर्व माहिती तुम्हाला वर्षानुसार मिळेल.

Important Events of Indian Freedom Struggle
CategoryStudy Material
ExamMPSC Group B and Group C Exam
SubjectHistory
NameImportant Events of Indian Freedom Struggle

Important Events of Indian Freedom Struggle | भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाच्या घटना

Important Events of Indian Freedom Struggle: MPSC मार्फत MPSC Group B पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 ला होणार आहे सोबतच, MPSC Group C पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे. दोन्ही परीक्षांमध्ये इतिहास विषयाला अनन्यसाधारण महत्व आहे. भारतातील तसेच महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास यावर परीक्षेत प्रश्न विचारल्या जातात. यात भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाच्या घटना (Important Events of Indian Freedom Struggle) घटक फार महत्वाचा आहे. कारण यावर जोड्या लावा, अचूक विधाने निवडा याप्रकारची प्रश्न विचारल्या जातात. आज आपण या लेखात भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वाच्या घटना (Important Events of Indian Freedom Struggle) कालानुक्रमे पाहणार आहे. ज्याचा फायदा आपणास आगामी MPSC Group B व MPSC Group C च्या परीक्षांमध्ये नक्की होईल.

3) India’s Tokyo Olympic Performance at a Glance: Study Material for MPSC Combine Exam 2022, भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात, या लेखात तुम्हाला भारताच्या टोकियो ऑलिम्पिक कामगिरीची तपशीलवार माहिती एका दृष्टीक्षेपात मिळेल. टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची माहिती.

India’s Tokyo Olympic Performance at a Glance
CategoryStudy Material
ExamMPSC Group B and Group C Exam
SubjectCurrent Affairs
NameIndia’s Tokyo Olympic Performance at a Glance

India’s Tokyo Olympic Performance at a Glance

*India’s Tokyo Olympic Performance at a Glance:  MPSC गट ब व MPSC गट क च्या परीक्षा, तसेच MPSC घेत असलेल्या इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने चालू घडामोडी हा खूप महत्वाचा विषय आहे. चालू घडामोडी हा विस्तृत विषय असून याचे जेवढे वाचन तेवढे चांगले. India’s Tokyo Olympic Performance at a Glance हा घटक चालू घडामोडी (Current Affairs) मध्ये येतो. चालू घडामोडी मध्ये क्रीडाविषयक बातम्या यावर प्रश्न विचारल्या जातात. Olympic दर चार वर्षांनी होतो. त्यामुळे याबद्दल माहिती असणे फार आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेत यावर्षी कोणत्या शिलेदाराने (Sports Person) कोणते पदक मिळवले यासारखे प्रश्न परीक्षेत विचारल्या जातात. आज या लेखात आपण परीक्षेच्या दृष्टीने India’s Tokyo Olympic Performance at a Glance बद्दल अत्यंत महत्वाची माहिती पाहणार आहे.

India’s Tokyo Olympic Performance at a Glance | भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात

India’s Tokyo Olympic Performance at a Glance (भारताची टोकियो ऑलिम्पिक कामगिरी एका दृष्टीक्षेपात):  जुलै 2020 ते ऑगस्ट 2020 या काळात नियोजित करण्यात आलेले टोकियो ऑलिम्पिक कोव्हीड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आले होते. नंतर हे ऑलिम्पिक 23 जुलै 2021 ते 08 ऑगस्ट 2021 या कालावधीत टोकियो मध्ये भरविण्यात आले. ही आधुनिक ऑलिम्पिकची 32 वी आवृत्ती होती. पॅरिसमध्ये झालेल्या सन 1900 च्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने प्रथमच सहभाग घेतला होता. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे 2020 च्या उद्घाटन समारंभात भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि भारतीय बॉक्सिंगपटू मेरी कोम हे भारताचे ध्वजधारक होते.

तर समापन सोहळ्याच्या समयी बजरंग पुनिया भारताचा ध्वजधारक होता. आजपर्यंत, 2020 टोकियो उन्हाळी ऑलिम्पिक भारतासाठी सर्वात यशस्वी स्पर्धा ठरली आहे. या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह एकूण 7 ऑलिम्पिक पदक जिंकण्याची भरीव कामगिरी केली. तर भारतीय गोल्फपटू आदिती अशोक, कुस्तीपटू दीपक पुनिया, भारतीय महिला हॉकी संघ यांना पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. 7 पदकांसह भारत एकूण पदकांच्या यादीत 33व्या तर सुवर्णपदक विजेत्यांनुसार 48व्या स्थानावर आहे आणि स्वतंत्र भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 18 क्रीडा विषयांमध्ये 126 खेळाडूंसह, भारताने टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली सर्वात मोठा संघ पाठवला होता. भारतीय खेळाडूंनी एकूण 69 स्पर्धांमध्ये भाग घेतला, जो देशासाठी आतापर्यंतचा सर्वोच्च आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *