अर्थव्यवस्था व अर्थव्यवस्थेचे प्रकार

अर्थव्यवस्था व अर्थव्यवस्थेचे प्रकार

अर्थव्यवस्था व अर्थव्यवस्थेचे प्रकार

अर्थव्यवस्थेची व्याख्या –

उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या चार प्रकारच्या व्यवहारांना ‘आर्थिक व्यवहार’ म्हटले जाते. या चार व्यवहारांशी संबंधित संस्था, संघटना यांच्या एकत्रिकरणातून तयार होणाऱ्या संस्थेला “अर्थव्यवस्था ” म्हणतात.

ऑडम स्मिथ यांच्या मते – ‘अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या संपतीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची आणि कारणांची चिकित्सा होय’.

अर्थव्यवस्था (Economics) हे एक प्रकारचे सामाजिकशास्त्र आहे.

अर्थव्यवस्थांचे प्रकार –

अ. उत्पादक साधनांच्या मालकीनुसार प्रकार –

१. भांडवलशाही अर्थव्यवस्था (Capitalistic economy)-

  • या व्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारामार्फत होते व त्यांच्या किंमती बाजारयंत्रणे करवी ठरतात.
  • किंमत ठरवण्याची प्रक्रिया ही सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असल्याने तिला “मुक्त अर्थव्यवस्था” / “Leissez faire” / “हस्तक्षेपविरहित अर्थव्यवस्था” असे ही म्हणतात.
  • वस्तू व सेवांच्या किंमती बाजारात मागणी व पुरावठ्यांच्या आधारे ठरतात त्यामुळे “बाजार अर्थव्यवस्था ” असेही म्हटले जाते.
  • येथे नफा मिळवण्याच्या उद्देशाने उत्पादन केले जाते.
  • उत्पादनाबाबत कुठलेही नियोजन नसल्यामुळे अशा अर्थव्यवस्थेला “अनियोजित अर्थव्यवस्था ” (Unplanned economy) असेही म्हणतात.

२. समाजवादी अर्थव्यवस्था (Socialistic economy) –

  • या व्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी किंवा सार्वत्रिक मालकीची असतात आणि वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सरकार मार्फत चालते.
  • ‘सामाजिक न्याय ‘ प्रस्थापित करणे, हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे .
  • वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही.
  • याच व्यवस्थेला “नियोजित अर्थव्यवस्था” असेही म्हणतात.
  • आदेशात्मक नियोजित अर्थव्यवस्था म्हणजेच नियोजित अर्थव्यवस्थेचे कडक-अतिकेंद्रीत स्वरूप . अशा अर्थव्यवस्थेत केंद्र सरकारच्या हातात सर्व आर्थिक अधिकार दिले जातात.
  • सूचनात्मक नियोजित अर्थव्यवस्था म्हणजे नियोजित अर्थव्यवस्थेचे थोडे ढिले स्वरूप. म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील गुंतवणूक किंवा उत्पादन वाढविण्यासाठी आदेश न देता सूचना दिली जाते. अनुदाने, सबसिडी, करमुक्तता अशी आमिषे दाखविली जातात.

३. मिश्र /संमिश्र अर्थव्यवस्था (Mixed economy) –

  • या व्यवस्थेत भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही प्रणाली मधील चांगल्या गुणांचा समन्वय साधला जातो.
  • येथे सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सह अस्तित्व असते.

ब. विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार –

१. विकसित अर्थव्यवस्था –

  • या व्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे मोठे प्रमाण, मोठ्या प्रमाणावरील औद्योगीकरण व शहरीकरण, साक्षरतेचे उच्च प्रमाण, घटता जन्मदर व मृत्युदर ही लक्षणे दिसून येतात.
  • उदाहरणार्थ – अमेरिका, जर्मनी, फ्रांस, जपान, ऑस्ट्रेलिया

२. विकसनशील अर्थव्यवस्था –

  • या व्यवस्थेत दरडोई उत्पन्नाचे अल्प प्रमाण, कमी औदोगीकीकरण, कृषी क्षेत्राचे प्राबल्य, साक्षरतेचे कमी प्रमाण, लोकसंख्या वाढीचा उच्च दर ही लक्षणे दिसून येतात.
  • उदाहरणार्थ – भारत, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान

अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *