Learn For Dreams
भारताचे माजी अँँटर्नी जनरल

भारताचे माजी अँँटर्नी जनरल अशोक देसाई यांचं निधन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि भारताचे माजी अॅटर्नी जनरल अशोक देसाई यांचं निधन झालं आहे. सोमवारी सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७७ वर्षांचे होते.
पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आल होतं. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. अशोक देसाई यांनी १९५६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयातून वकिलीला सुरुवात केली होती.
८ ऑगस्ट १९७७ रोजी वरिष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ९ जुलै १९९६ ते ६ मे १९९८ पर्यंत ते भारताचे अॅटर्नी जनरल होते. २००१ मध्ये त्यांचा पद्मविभूषण तसंच लॉ ल्युमिनेरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
अशोक देसाई १९६४ मध्ये लॉ कॉलेज बॉम्बे येथे प्रोफेसर होते. तसंच १९६७ ते १९७२ दरम्यान बॉम्बे कॉलेज ऑप जर्नलिझम येथे ते लेक्चरर म्हणून काम करत होते. त्यांनी अनेक पुस्तकंदेखील लिहिली आहेत. तसंच त्यांचे अनेक लेखही प्रसिद्ध झाले आहेत.
सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now
महत्वाचे शब्द :अशोक देसाई यांचं निधन, Ashok Desai Nidhan

