MPSC Group C Recruitment 2023 || MPSC गट क साठी भरती 2023 ||

MPSC Group C Recruitment 2023
MPSC Group C Recruitment 2023 : जाहिरात क्रमांक ००१/२०२३ दिनांक २० जानेवारी, २०२३ नुसार आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२३ मधून भरावयाच्या गट-क संवर्गाच्या दिनांक ०१ सप्टेंबर, २०२३ व १२ सप्टेंबर, २०२३ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा रविवार, दिनांक १७ डिसेंबर, २०२३ रोजी राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या सहा जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल. या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी ३१ ऑक्टोबर च्या आत अर्ज सादर करावेत. हि भरती प्रक्रिया वेगवेगळ्या ७५१० पदांसाठी होत आहे. या पदासाठी पात्र ठरलेले उमेदवार या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी महत्वाचे अपडेटविषयी त्वरित माहिती हवी असल्यास आमच्या Telegram चॅनेल ला अवश्य भेट दया.

अ. क्र. तपशील विहित कालावधी
1 अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 31 ऑक्टोबर, 2023 रोजी 14.00 ते दिनांक 31 ऑक्टोबर, 2023 रोजी 23:59
2 ऑनलाइन पध्दतिने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक 31 ऑक्टोबर, 2023 रोजी 23:59
3 भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी 23:59
4चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये

अधिक माहिती साठी आमचे OOAcademy चे App तुमच्या मोबाइल मध्ये Download करा.
परीक्षेचे नाव महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३
पदाचे नाव उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक
एकूण ७५१० जागा
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा शुल्क –
अमागास – रु. 544/-
मागासवर्गीय- रु.344/-
माजी सैनिक – रु.44/-

अर्ज करण्याची पद्धती :- ऑनलाइन

अर्ज सुरु होण्याची तारीख – १७ ऑक्टोबर २०२३

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०२३ 

अधिकृत वेबसाइट :- https://mpsc.gov.in/

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

उद्योग निरीक्षक, गट-क :-

सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

कर सहाय्यक :- मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

लिपिक-टंकलेखक :-

मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

जाहिरात पाहा

ऑनलाइन अर्ज करा

For more information related to recruitment, you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit OOAcademy pune daily to get free job alerts in Marathi for other government jobs.

See more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *