Maharashtra Anganwadi Supervisor Exam Syllabus in Marathi PDF Download 2023

Maharashtra Anganwadi Supervisor Exam Syllabus in Marathi 2023 अंगणवाडी सुपरवायझर  किंवा पर्यवेक्षिका (Anganwadi Supervisor) जिल्हा परिषद अंतर्गत  महिलांसाठी असणारे महत्त्वाचे  पद आहे. या मध्ये पुरुष उमेदवार अपात्र ठरतात. 

अंगणवाडी पर्यवेक्षिका Anganwadi Supervisorया पदाची भरती जिल्हा परिषदेमार्फत महाराष्ट्रामध्ये केली जाते. अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाची काठिण्यपातळी पदवी पर्यंतची आहे. मराठी विषयासाठी काठिण्यपातळी बारावीपर्यंतची आहे. इतर विषयांसाठी  पदवी ही परीक्षेची काठिण्यपातळी आहे.

Anganwadi Supervisor /अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी पात्रता

अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाचा अर्ज करताना उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे. ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधिक विद्यापीठाची समाजशास्त्र, गृह विज्ञान, शिक्षण, बालविकास, पोषण या विषयातील स्नातक पदवी धारण केलेली आहे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. संबंधित विषयातील उमेदवारांना फक्त प्राधान्य देण्यात येईल असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ इतर विषयातील पदवीधारक या पदासाठी पात्र नाहीत असा चुकीचा अर्थ काढून नये.

Maharashtra Anganwadi Supervisor Exam
Maharashtra Anganwadi Supervisor Exam

परीक्षेचा कालावधी

अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी परीक्षा 200 गुणांसाठी आयोजित केली जाईल ज्यामध्ये 100 प्रश्न असतील. परीक्षेसाठी कालावधी दीड तासाचा म्हणजेच 90 मिनिटांचा आहे.परीक्षा मध्ये चार विषयांवरती प्रश्न विचारले जातील त्याचा आराखडा पुढील प्रमाणे आहे.

विषयप्रश्न संख्यागुण 
इंग्रजी२५५०
मराठी२५५०
सामान्य ज्ञान२५५०
तर्क क्षमता व अनुमानात्मक चाचणी२५५०

Anganwadi Supervisor Exam Scheme

 क्रविषयमहत्वाचे घटक
1गणितसंख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावि आणि लसावि, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळ-काम-वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाणे
2बौद्धिक चाचणीक्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन
3मराठी व्याकरणमराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द) म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले, प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
4सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीइतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक
5English
ooacademy.co.in

परीक्षेचे स्वरूप – सरळ सेवा परीक्षा

 सरळ सेवा म्हणजे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे मध्ये गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांची इतर कोणत्याही प्रकारची चाचणी घेण्यात येणार  नाही.  निवड झालेल्या जिल्हा परिषदेमध्ये कागदपत्रांची पडताळणी होईल.

प्रश्नपत्रिकेचे माध्यम

 मराठी विषय हा फक्त मराठी भाषेतून असेल इतर विषय इंग्रजी व मराठी भाषेतून असते. इंग्रजी विषय फक्त इंग्रजी भाषेतून असेल.

अंगणवाडी सुपरवायझर साठी वेतन पुढील प्रमाणे

9300 – 34800  ग्रेड वेतन- 4100

जाहिरात कोण देतात?

 महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका पदांच्या भरती चे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेला आहे.  जिल्हा परिषद आपल्या विविध पदांच्या भरती संदर्भात जाहिरात  काढते तेव्हा  या पदाची जाहिरात येत असते.

अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षेचा तयारी करता उपयुक्त पुस्तके

ही पुस्तके याठिकाणी तुम्ही पाहू शकता.

मराठी – सुगम मराठी  व्याकरण व लेखन (मो. रा. वाळिंबे)

अंकगणित – संपूर्ण गणित (पंढरीनाथ राणे)

बुद्धिमत्ता – समग्र बुद्धिमत्ता चाचणी (फिरोज पठाण)

अंगणवाडी पर्यवेक्षिका पदांची  भरती 2019  मध्ये करण्यात आली होती. अपेक्षा आहे आपल्या प्रश्नांची उत्तरे या  ठिकाणी मिळाली असतील. तरीही काही शंका व सूचना असतील तर स्वागत आहे.

One thought on “Maharashtra Anganwadi Supervisor Exam Syllabus in Marathi PDF Download 2023

  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *