Learn For Dreams
लसूणचे गुणधर्म व उपयोग Properties and uses of Garlic
लसूण
लसूण हे कांद्याच्या परिवारातील एक कंदमूळ आहे.
कांद्याप्रमाणे कच्च्या लसणाला उग्र वास व चव असते परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते.
प्राचीन काळापासून लसणाचा उपयोग स्वयंपाकात व औषधोपचारासाठी केला गेला आहे.
लसणाचे असंख्य गुणकारी गुणधर्म शास्त्रीय संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहेत.
एकूण लसूण उत्पादनात जगामध्ये चीनचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
लसणाचे उपयोग :
१. कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात .
२. लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .
३. बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.
४. गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो .
५. किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .
६. कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे . हेच तेलं छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .
७. भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, अजीर्ण, पोटात वेदना, जंत, अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .
८. भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .
९. हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .
१०. लसूण घालून उकळलेले दुध दिल्यास जुनाट खोकला , दमा, क्षयरोग यांचा नाश होतो .
काळजी
लसूण तीक्ष्ण , उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती,गर्भिणी यांना तो वर्ज्य आहे.
जास्त लसूण खाल्ल्याने त्रास झाला तर माठातील थंडगार पाण्यात धने पावडर भिजवून ते पाणी गाळून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाजावे.
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now